शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दूध व्यवसाय येतोय पूर्वपदावर; खासगी संघांकडून गोची करण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:25 IST

सातत्याने बदलणारा दूध खरेदी दर शेतकऱ्यांना अडचणीचा

ठळक मुद्देपुणे विभागात २१ सहकारी व खासगी लहान- मोठे २६० ब्रॅँड दूध संकलन करतात राज्यात साधारण ४० सहकारी संघ तर पुणे विभागात २१ सहकारी दूध उत्पादक संघराज्यात खासगी संघ गाईचे दूध २३, २४ व २५ रुपयाने खरेदी करीत आहेत

सोलापूर: कोरोना महामारी काळात अडचणीत आलेला दूध व्यवसाय सावरु लागला असताना खासगी दूध संस्थांनी संघटितपणे दूध खरेदी दर कमी करण्याचा प्रयत्न करून उत्पादकांची गोची केली जात आहे. सातत्याने बदलणाऱ्या दरामुळे दूध उत्पादक अडचणीत असताना शासन मात्र यावर गप्प आहे.

दूध उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील दूध उत्पादक सतत बदलणाऱ्या दरामुळे अडचणीत आलेत. कोरोनाच्या अगोदर मार्च महिन्यात गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३० रुपयांवर गेला होता. मार्च महिन्याच्या अखेरला कोरोनामुळे लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे दूध विक्रीला मोठा फटका बसला. हाॅटेल व्यवसाय बंद झाले व घरगुतीसाठीही दूध पुरवठा करणे अडचणीचे ठरले. ऐन लग्नसराई व उन्हाळ्यात दूध उत्पादकांवर कोरोनामुळे संक्रांत आली. सप्टेंबरपासून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने दुधाला मागणीही वाढली आहे.

त्यामुळे १७- १८ रुपयांवर आलेला दूध खरेदी दर सावरु लागला. शासनाने सहकारी दूध संघांचे काहीअंशी दूध खरेदी सुरू केली; मात्र अनेक सहकारी संघ व खासगी दूध संघांना अनुदान योजनेचा फायदा मिळाला नाही. कोरोनामुळे १८ रुपयांवर आलेला गाईच्या दुधाचा खरेदी दर सावरत सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात २५ रुपयांवर गेला होता. दर चांगला मिळू लागताच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटत असतानाच खासगी दूध संघांनी एकत्रित येत दूध खरेदी दर प्रतिलिटर २२ रुपये इतका करण्याचा प्रयत्न केला.

खासगी संघांनी २१ ऑक्टोबरपासून गाईचे दूध २२ रुपयाने खरेदी करण्याबाबतचे दरपत्रक काढले असले तरी त्याची अंमलबजावणी केली जात नाही. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी कोरोनामुळे फारच खाली आलेला दर चांगलाच सावरला आहे. सातत्याने दूध खरेदी दर बदलत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

 

राज्यात दररोज एक कोटी ६० लाख लिटर दूध संकलन

  • - पुणे विभागात २१ सहकारी व खासगी लहान- मोठे २६० ब्रॅँड दूध संकलन करतात.
  • - राज्यात साधारण ४० सहकारी संघ तर पुणे विभागात २१ सहकारी दूध उत्पादक संघ आहेत. राज्यातही २६० खासगी दूध ब्रॅँड आहेत.

 

राज्यात खासगी संघ गाईचे दूध २३, २४ व २५ रुपयाने खरेदी करीत आहेत. दूध दर चांगला सावरला आहे. पुणे विभागातच राज्याच्या तुलनेत ८० टक्के दूध संकलन होत आहे.

- प्रकाश कुतवळ, ऊर्जा दूध, पुणे

टॅग्स :SolapurसोलापूरMilk Supplyदूध पुरवठा