मिलिंद शंभरकर यांची बदली, कुमार आशिर्वाद साेलापूरचे नवे जिल्हाधिकारी
By राकेश कदम | Updated: July 21, 2023 21:05 IST2023-07-21T21:05:43+5:302023-07-21T21:05:58+5:30
राकेश कदम, साेलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली झाली असून गडचिराेली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची यांची ...

मिलिंद शंभरकर यांची बदली, कुमार आशिर्वाद साेलापूरचे नवे जिल्हाधिकारी
राकेश कदम, साेलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची बदली झाली असून गडचिराेली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची यांची साेलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची बदली झाली असून त्यांच्या जागा मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य सरकारने शुक्रवारी रात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जनआराेग्य आराेग्य याेजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांची बदली झाली असली तरी त्यांची नव्या जागी नियुक्ती झालेली नाही.