अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद मोहिते रूजू

By Admin | Updated: May 6, 2017 19:30 IST2017-05-06T19:30:25+5:302017-05-06T19:30:25+5:30

-

Milind Mohite Ruju as Additional Police Superintendent | अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद मोहिते रूजू

अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद मोहिते रूजू


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधिक्षकपदी मिलिंद लालासाहेब मोहिते हे शनिवारी रूजू झाले़ दरम्यान, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी त्याचे स्वागत केले़ राज्याच्या गृहविभागाने राज्यातील पोलीस उपायुक्त, उपअधिक्षक, पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या़ अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मिलिंद मोहिते यांनी अप्पर पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली़ मिलिंद मोहिते यांचा जन्म सांगली येथे झाला़ त्यांनी यापुर्वी पुणे ग्रामीण, पुणे शहर त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक येथे सेवा बजावली आहे़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबरोबरच पोलीस व नागरिक यांच्यात सुसंवादावर जास्तीचा भर देण्यावर माझा प्रयत्न राहील असे मत मिलिंद मोहिते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले़

Web Title: Milind Mohite Ruju as Additional Police Superintendent