शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मेडिकल इमर्जन्सीसाठी सोय; पोलिसांना फोन लावा, रिक्षा हजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:53 PM

प्रत्येक पोलिस ठाण्यात पाच रिक्षा; संचारबंदी काळातील शहर पोलिसांची व्यवस्था

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. १६ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून सोलापुरात संचारबंदीअत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाल्यासह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेतमेडिकल किंवा हॉस्पिटल याची इमर्जन्सी असेल तर संबंधित व्यक्तीचा पत्ता, नाव घेऊन रिक्षाचालकाला पाठवले जाणार

सोलापूर : संचारबंदीच्या काळात मेडिकल इमर्जन्सी असेल तर संबंधित व्यक्तीला सेवा देण्यासाठी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनला पाच रिक्षा नियुक्त करण्यात आल्या आहेत. पोलीस स्टेशनला फोन लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला तत्काळ रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. १६ जुलै रोजीच्या मध्यरात्रीपासून सोलापुरात संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता भाजीपाल्यासह सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. शहरातील नगरे,वस्त्या, झोपडपट्टी, सोसायटी आदी भागात राहणाºया लोकांना मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास त्यांना रिक्षाची सोय करुन देण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर प्रथमत: त्या व्यक्तीची अडचण जाणून घेतली जाणार आहे. मेडिकल किंवा हॉस्पिटल याची इमर्जन्सी असेल तर संबंधित व्यक्तीचा पत्ता, नाव घेऊन रिक्षाचालकाला पाठवले जाणार आहे. संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी ही सुविधा देण्यात आली आहे. 

दरम्यान, मागील काळातील अनुभव घेता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये गैरसोय होऊ नये म्हणून दहा रिक्षा नियुक्त करण्यात आल्या आहेत. या रिक्षा हद्दीतील नगर, सोसायटी व झोपडपट्टी असा भाग पाहून त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत असे, सदर बझारचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी सांगितले. 

या नंबरवर करा फोन...फौजदार चावडी पोलीस ठाणे- ०२१७- २७४४६२१, जेलरोड पोलीस ठाणे-०२१७- २७४४६३१ सदर बझार पोलीस ठाणे-०२१७- २७४४६४१ विजापूर नाका पोलीस ठाणे- ०२१७- २७४४६५१, सलगर वस्ती पोलीस ठाणे-०२१७- २७४४६६१, एमआयडीसी पोलीस ठाणे-०२१७- २७४४६९०, जोडभावी पेठ पोलीस ठाणे-०२१७- २७४४६३४. असे सात पोलीस ठाण्याचे फोन नंबर आहेत. संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मेडिकलची अडचण सांगितल्यास ती दूर केली जाणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस