सोलापूर महापालिकेच्या सभेला उशिर, संतप्त महिला सदस्यांनी केली महापौरांची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 17:49 IST2018-08-30T17:45:33+5:302018-08-30T17:49:30+5:30

Mayor's Aarti by the seemingly, angry women members of Solapur Municipal Council | सोलापूर महापालिकेच्या सभेला उशिर, संतप्त महिला सदस्यांनी केली महापौरांची आरती

सोलापूर महापालिकेच्या सभेला उशिर, संतप्त महिला सदस्यांनी केली महापौरांची आरती

ठळक मुद्देआॅगस्ट महिन्याची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती़सायंकाळचे साडेपाच वाजले तरी सभा सुरु करण्यात आली नाही संतप्त महिलांनी सत्ताधाºयांच्या विरोधात घोषणाबाजी दिली़ 

सोलापूर : गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेस उशिर झाला़ बोलविण्यात आलेली सभा वेळेत सुरू न केल्यामुळे काँग्रेसच्या महिला पदाधिकाºयांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करण्यात आली़ यावेळी संतप्त महिलांनी सत्ताधाºयांच्या विरोधात घोषणाबाजी दिली.

महापालिकेची आॅगस्ट महिन्याची तहकूब सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती़ सायंकाळचे साडेपाच वाजले तरी सभा सुरु करण्यात आली नाही, त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, परविन इनामदार या संतापल्या़ नगरसचिव सभा सुरू करा... एलईडी चा वाटाघाटी संपल्या की नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या़.

शेवटी सर्वजण महिला सदस्य महापौर कक्षाच्या जाऊन घोषणाबाजी सुरू केली़ आज संकष्टी आहे सभा लवकर सुरू करा म्हणून आरती सुरू केली संतापलेल्या सदस्य तशाच अर्थ घेऊन सभागृहात आल्या व महापौर चा कक्षासमोर ठिय्या मारला़ 
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

Web Title: Mayor's Aarti by the seemingly, angry women members of Solapur Municipal Council