सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार

By Appasaheb.patil | Updated: July 21, 2023 19:37 IST2023-07-21T19:36:50+5:302023-07-21T19:37:09+5:30

ऑगस्टपासून सावरकर तलाव सुरू होणार

Markandey and Savarkar swimming pools in Solapur will be opened for citizens | सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार

सोलापुरातील मार्कंडेय अन् सावरकर जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले होणार

सोलापूर : अशोक चौक परिसरात असलेल्या मार्केडेय जलतरण तलावाची ई-निविद्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार असून लवकरच नागरिकांसाठी हे जलतरण तलाव खुले करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी लोकमत शी बोलताना दिली.

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी शुक्रवारी मार्कंडेय जलतरण तलाव येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, विभागीय अधिकारी महेश क्षीरसागर, क्रीडा अधिकारी मुर्तुजा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्कंडेय जलतरण तलाव येथे सध्या खेळाडूंच्या प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जलतरण तलावाचे ई-निविद्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करून नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सध्या जलतरण तलावाचे विविध दुरुस्तीचे कामे करण्याचे सूचना यावेळी आयुक्तांनी विभागीय अधिकार्यांना दिल्या आहेत.

ऑगस्टपासून सावरकर तलाव सुरू होणार

पार्क चौकात इंदिरा गांधी स्टेडियमशेजारी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. नूतनीकरणासाठी हे तलाव बंद होते, नुतनीकरणाचे काम पूर्ण अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. हे तलाव १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Markandey and Savarkar swimming pools in Solapur will be opened for citizens