मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला

By Appasaheb.patil | Updated: September 6, 2023 15:55 IST2023-09-06T15:55:36+5:302023-09-06T15:55:55+5:30

बार्शी - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

Maratha society aggressive; The Solapur-Barshi highway was blocked for two hours protesting the government | मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला

मराठा समाज आक्रमक; शासनचा निषेध करीत सोलापूर-बार्शी महामार्ग दोन तास रोखला

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : जालना येथील मराठा समाजावर पोलिसांच्या वतीने करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अनेक महिला, लहान मुलं, वृद्ध पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झाल्यामुळे अकोलेकाटी येथील मराठा समाज महाराष्ट्र सरकारचा निषेधार्थ बार्शी - सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. याशिवाय बार्शी टोलनाक्यावरही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली होती. 

अकोलेकाटी येथील बार्शी - सोलापूर रस्त्यावर येथे मराठा समाज बांधव एकत्र येऊन शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उत्तर सोलापूर तालुका पोलीस स्टेशन ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त  होता. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन आयोजक सरपंच अंजली क्षीरसागर यांनी पोलिसांना दिले. यावेळी महेश गोरे, राजेंद्र माने, दत्ता लामकाने, सोमा मोहोळकर, बालाजी लामकाने, राहुल लामकाने, भैरू माने, समाधान माने, अक्षय माने, विठ्ठल माने, केशव जवगुडे, मंगेश गोरे, गोविंद लामकाने, दीपक डांगे, विठ्ठल जीवगुंडे, अवि सुरवसे, ज्ञानेश्वर माने, प्रवीण लामकाने, माऊली लामकाने आदी मराठा बांधव उपस्थित होते

Web Title: Maratha society aggressive; The Solapur-Barshi highway was blocked for two hours protesting the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.