सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक;

By दिपक दुपारगुडे | Updated: October 20, 2023 14:57 IST2023-10-20T14:57:26+5:302023-10-20T14:57:41+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी भव्य सभा घेतली.

Maratha society aggressive against Sadavarts; | सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक;

सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक;

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी भव्य सभा घेतली. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मराठा समाजाच्या वतीने सदावर्ते यांच्या वक्तव्याच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाणे या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे. तसेच तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्याना नाही थांबवले तर त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

Web Title: Maratha society aggressive against Sadavarts;