शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण ; अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, भव्य मोर्चाने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:53 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ .

ठळक मुद्दे- संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांनी संपाला दिला पाठींबा- शासनाच्या विरोधात घोषणाबाजी- हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोट शहर मराठा क्रांती व सकल समाजाच्यावतीने सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी अक्कलकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले़ यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आली़ या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे हिंसक वळण लागू नये यासाठी अक्कलकोट शहर पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

या मोर्चात अमोल भोसले, आ. सिध्दाराम म्हेत्रे, जि. प. कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, नगराध्यक्षा शोभा खेडगी, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, शहर भाजपा अध्यक्ष यशवंत धोंगडे, भाजपा पक्षनेते नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी, व्यापारी   महासंघाचे अध्यक्ष  मल्लिनाथ साखरे, अडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष स्वामीनाथ हिप्परगी, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर मजगे, मुस्लीम समाज अध्यक्ष एजाज मुतवल्ली, अल्लीबाशा अत्तार, मैनोद्दीन कोरबू, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी, तालुका शिवसेनाप्रमुख मनोज पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीप सिध्दे, रासपचे  जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर आदी मान्यवर व मराठा बांधव सहभागी झाले होते

या मोर्चाला लहूजी शक्ती सेना, नाभिक समाज संघटना, संत गाडगेबाबा परीट समाजसेवा मंडळ, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष अभय खोबरे, विवेकानंद प्रतिष्ठान, प्रहार जनशक्ती पक्ष, संत कक्कया युथ फाउंडेशन, जनसेवा संघटनेचे अध्यक्ष नितीन मोरे यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, माजी उपसभापती विलास गव्हाणे, प्रा. प्रकाश सुरवसे, मनोज इंगवले, मनोज निकम, मनोज गंगणे, आकाश गडकरी, योगेश पवार, आतिष पवार, वैभव नवले, शीतल जाधव, गोविंद शिंदे, स्वप्निल मोरे, सुरेश कदम, चेतन शिंदे, संजय गोंडाळ आदी मराठा समाजातील नेतेमंडळी उपस्थित होती. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStrikeसंपSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस