महाराष्ट्रातला माओवाद आज पूर्णपणे संपला:- देवेंद्र फडणवीस
By आप्पासाहेब पाटील | Updated: October 15, 2025 16:32 IST2025-10-15T16:32:30+5:302025-10-15T16:32:58+5:30
गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात माओवादी आत्मसमर्पण करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातला माओवाद आज पूर्णपणे संपला:- देवेंद्र फडणवीस
सोलापूर : गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवादाबाबत घेतलेली भूमिका आणि आखलेल्या योजना याचा परिपाक म्हणून आताच्या घडीला देशातून मोठ्या प्रमाणात माओवादा पूर्णपणे संपलेला आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ बुधवारी सोलापूर विमानतळावर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, स्टार एअरलाइन्सचे संजय घोडावत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात माओवादी आत्मसमर्पण करत आहेत. माओवाद उच्चाटनसाठीच्या मोहिमेचे नेतृत्व केले. मोठी ऑपरेशन या भागात राबवली. जहाल आणि वरिष्ठ केडर यांना नेस्तनाबूत करण्याचे काम केले. आजच्या घडीला महाराष्ट्रातला माओवाद आज पूर्णपणे संपल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षात विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या २३ कोटीने वाढली. सर्वसामान्य माणसाला विमानाने जाण्याचं स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३२ हजार कोटीचे पॅकेज दिले, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात, दिवाळीपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार, कितीही आपत्ती आली तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचेही ते म्हणाले.