शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

"मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार..."राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:27 IST

Rajendra Raut, Manoj Jarange Patil : आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले.

Rajendra Raut, Manoj Jarange Patil ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजपाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल जरांगे पाटील यांनी बार्शीत माझी बाजू घेणाऱ्या तरुणाला राजेंद्र राऊत यांनी मारहाण केल्याचा आरोप  केला. दरम्यान, आज भाजपा आमदार राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. 

अजित पवार कुठेत? अमित शाहंसोबत शिंदे फडणवीस लालबागच्या दर्शनाला आले, दादा मुंबईतच पण...

"जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी स्थापन होत होती, तेव्हा तीच त्याला उघड विरोध केला होता, तुम्हीच उपोषण सोडत असताना खुलासा केला होता.  आता नेमकं माझं काय चुकलं? तुम्ही माझ्यावर बोलत आहात. मी आणि माझ्या तालुक्यातील काही मराठा बांधवांनी प्रश्न केले म्हणून तुम्ही मला बोलायला लागले. माझ्या तालुक्यातील लोकांना काही संशय आला आहे, त्याच उत्तर द्या. तुम्ही हे करण्यापेक्षा बघतो, दारातच सभा घतो, ताईला सांगा, वडिलांना सांगा. एवढा अहंकार असू नये, रावणाची लंकाही राहिलेली नाही,  दुर्योधनाचे काय झाले आहे सर्वांना माहिती आहे, एवढा अहंकार कामाचा नाही, असंही राजेंद्र राऊत म्हणाले. 

'आम्हीही जशास तसे उत्तर देणार'

"मनोज जरांगे पाटील यांना कोणीही प्रश्न विचारला तरीही हे एकेरीची भाषा करतात. बघतो, ठेवतो, पाडतो, दाखवतो बोलतात. तुम्ही मुख्यमंत्री, आमदरांना शिव्या देताय. तुम्हाला मराठा चळवळ अखंडपणाने पुढे न्यायची आहे की यातून वेगळे काहीतरी साध्या करायचे आहे?, असा सवालही राऊत यांनी केला. मी कधीही खोट बोलणार नाही, या ठिकाणी यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवला तरी त्यांच्याविरोधात लगेच फोन सुरू होतात. यांनी सगळा सोशल मीडिया फीट करुन ठेवला आहे. याचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडून केला जातो, असा गंभीर आरोपही राजेंद्र राऊत यांनी केला. प्रामुख्याने परभणी, बीड, जालना या ठिकाणी यांचे केंद्र बिंदू आहे ही माहिती आम्हाला मिळाली आहे. यांच्याविरोधात कोणी प्रश्न विचारला की लगेच फोन सुरू होतात. मलाही सुरू झालेत. मी माझ्या स्टाईलने उत्तरे दिली आहेत. हे आता बंद करा, आम्हीही जशास तसे उत्तर देणार. मराठा एक चळवळ आहे या चळवळीला गालबोट लावू नका, असंही राजेंद्र राऊत म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस