मनीशा आव्हाळे यांनी सीईओचा पदभार स्वीकारला

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 22, 2023 13:03 IST2023-07-22T13:03:26+5:302023-07-22T13:03:41+5:30

सोलापूर जिल्हा परिषदेत ही राज्यातील पहिल्या तीन मोठ्या जिल्हा परिषदेमध्ये येते त्यामुळे येथे काम जास्त आहे.

Manisha Avhale took over as CEO | मनीशा आव्हाळे यांनी सीईओचा पदभार स्वीकारला

मनीशा आव्हाळे यांनी सीईओचा पदभार स्वीकारला

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत नव्यानेच नियुक्त झालेल्या मनीषा आव्हाळे यांनी सीईओचा पदभार स्वीकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मनीषा आव्हाड यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

शुक्रवार रोजी 21 जुलै रोजी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. शासनाच्या आदेशानुसार मनीषा आव्हाळे यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली. शनिवारी सकाळी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला पदभार स्वीकारला. सीईओ दिलीप स्वामी यांनी शिक्षण विभाग विभागाकडून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या उपक्रमांमध्ये सातत्य ठेवा असे त्यांना आवाहन केले.

सोलापूर जिल्हा परिषदेत ही राज्यातील पहिल्या तीन मोठ्या जिल्हा परिषदेमध्ये येते त्यामुळे येथे काम जास्त आहे. अनेक फायली येत असतात, जिल्हाभरातून आलेल्या अनेक लोकांना भेटावे लागते. सोलापूर जिल्हा हा लोकसंख्या आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. ) तुम्ही चांगले काम कराल अशा शुभेच्छा दिलीप स्वामी यांनी दिल्या मनीषा आव्हाळे यांना दिल्या. 

शनिवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी हे मनीषा आव्हाळे यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागातील सर्व कर्मचारी यांनी आव्हाळे यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Manisha Avhale took over as CEO