मंगळवेढा सबजेलमधुन आरोपीचे पलायन, कंपाउंड भिंतीवरून मारली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:29 IST2018-12-03T10:27:13+5:302018-12-03T10:29:49+5:30
सोलापूर : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून मंगळवेढा सबजेलमधुन पळून गेल्याची घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ...

मंगळवेढा सबजेलमधुन आरोपीचे पलायन, कंपाउंड भिंतीवरून मारली उडी
ठळक मुद्दे- कंपाउंट भिंतीवरून मारली उडी- पोलीस कर्मचाºयांची धावपळ- आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना
सोलापूर : न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारून मंगळवेढा सबजेलमधुन पळून गेल्याची घटना सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
दादासाहेब दिगंबर लेंडवे (वय ४८ रा़ लेंडवे चिंचोळे ता़ मंगळवेढा) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे़ दादासाहेब लेंढवे हा सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचास बाहेर काढले असता त्याने सबजेलच्या कंपाउंड भिंतीवरून चादरी फाडून एकमेकांना गाठी मारून पळून गेल्याची घटना घडली.
दादासाहेब लेंडवे याच्याविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात भा़द़ वि ३०७, ३२६, ५०४, ५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे़