मंगळवेढा-सोलापूर महामार्ग बंद; एस-टी गाड्यांच्या फेºया रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 02:18 PM2020-10-15T14:18:31+5:302020-10-15T14:19:01+5:30

शेतकरी हवालदिल; पुराचे शेतीत पाणी घुसल्याने शेतीपिकांचे नुकसान

Mangalvedha-Solapur highway closed; S-T train fares canceled | मंगळवेढा-सोलापूर महामार्ग बंद; एस-टी गाड्यांच्या फेºया रद्द

मंगळवेढा-सोलापूर महामार्ग बंद; एस-टी गाड्यांच्या फेºया रद्द

googlenewsNext

मंगळवेढा : बेगमपुर (ता़ मंगळवेढा) येथील भिमानदीवरील पुल नुकताच पाण्याखाली गेल्याने सोलापूरकडे जाणारी सर्व वाहतूक थांबविण्यात आली आहे, तसेच नदीकाठावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस पिकात पाणी घुसल्याने ऊस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नदी काठावरील शेतीपंप पाण्यात बुडून अर्थिक नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

मंगळवेढा आगारातून सुटणाºया सोलापूर, पंढरपूर, सांगोला, पुणे मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मंगळवेढा बसस्थानकावर कर्नाटक राज्यातील महिला प्रवासी वर्ग बसेस अभावी अडकून पडल्या आहेत. 

Web Title: Mangalvedha-Solapur highway closed; S-T train fares canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.