शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सोलापुरातील मंगल कार्यालय, पानटपरी, क्लब, परमिट रूम आजपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:27 IST

कोरोनामुळे जिल्हाधिकाºयांनी घेतला निर्णय; अद्याप ४ जण अ‍ॅडमिट: नव्याने दोन संशयित निगराणीसाठी दाखल

ठळक मुद्देगर्दी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी काही हॉटेल बंद ठेवण्याबाबत सूचनाकोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ४0 लाख रुपये राज्य शासनाने उपलब्ध केले लोकांनी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे

सोलापूर : कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी आता शहर व जिल्ह्यातील मंगल कार्यालये, पानटपºया, क्लब आणि परमीट रूम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी यापूर्वी आठवडा बाजार, मॉल, सिनेमागृहे, जीम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मंगल कार्यालये व पानटपºया बंद करण्यात येणार आहेत. मंगल कार्यालयात लग्न व इतर कार्यासाठी आदेश देऊनसुद्धा लोक गर्दी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता ३१ मार्चपर्यंत मंगल कार्यालये बंद राहतील. त्याचबरोबर पानटपºयावर लोक मोठ्या संख्येने जमा होतात. त्या ठिकाणी पान, तंबाखू व मावा अशाप्रकारच्या पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर थुंकण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोना साथीचा प्रसार थुंकीतून वेगाने होतो. त्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. क्लब व परमीटरूमही बंद ठेवावेत असे बंदी आदेशात नमूद केले आहे. दहावी परीक्षेच्या वेळेस शहरात जमावबंदी लागू केली आहे. परीक्षा केंद्र परिसरात याची अंमलबजावणी केली जात होती. आता शहर व परिसरात सर्वत्र पाचपेक्षा जादा लोक जमण्यास बंदीचा अंमल करण्यात येत आहे.

दोन दिवसात चार संशयित- शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आत्तापर्यंत १३ रुग्ण उपचारासाठी आले. त्यापैकी ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप चार रुग्ण दाखल आहेत व त्यांचे अहवाल यायचे आहेत. दाखल असलेले हे रुग्ण दोन दिवसात आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण बुधवारी रात्री नव्याने दाखल झाले आहेत. या चारही रुग्णांचे स्वॅब काढून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या चौघांची प्रकृती उत्तम आहे. संशयित रुग्णाच्या संपर्कात व बाहेरून आलेले ९६ जण त्यांच्या घरीच निगराणीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी १५ जणांचा कालावधी संपला आहे. आता ८१ जण निगराणीखाली आहेत. जिल्ह्यात चिंता करण्यासारखी कोणतीच स्थिती नसल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्पष्ट केले.  

उपाययोजनेसाठी मिळाले ४० लाखकोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ४0 लाख रुपये राज्य शासनाने उपलब्ध केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. यातील बहुतांश रक्कम आयएफसीवर खर्च केली जाणार आहे. तसेच जनजागृतीसाठी महापालिका व जिल्हा परिषद स्तरावर काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने १५ हजार पोस्टर वाटले आहेत. आता आणखी दोन लाख पोस्टर दिले जाणार आहेत. आशावर्करमार्फत घरोघरी हे पोस्टर दिले जाणार आहेत. लोकांनी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

हॉटेल होणार बंद- गर्दी टाळण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी काही हॉटेल बंद ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. हॉटेल, कपडे विक्री, दागिने विक्रीच्या दुकानात गर्दी होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत हॉटेल चालकांची शुक्रवारी बैठक बोलाविण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकाºयांचाही याबाबत फिडबॅक घेतला जाईल. त्यानंतर हॉटेल बंद ठेवण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संदीप जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त वैशाली कडुकर, अपर अधीक्षक अतुल झेंडे, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ठाकूर उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhotelहॉटेल