शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर समिती करणार ‘संतवाणी’ रेडिओ वाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST

नव्या तंत्रज्ञान युगाचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. जगभरातील माहिती घरबसल्या पाहण्याची सोय नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. ...

नव्या तंत्रज्ञान युगाचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. जगभरातील माहिती घरबसल्या पाहण्याची सोय नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिली आहे. खेड्यातील कौलारू घरात बसून ते थेट परदेशातील आलिशान कार्यालयात बसून आता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन घेणे यामुळेच सहज शक्य आहे. या तंत्रज्ञानामुळेच काही वर्षांपासून पंढरीची वारीदेखील जगभरात पोहोचलीय. सर्वांचा विचार करून कोल्हापूर येथील धैर्यशील पाटील यांना संतवाणी कम्युनिटी रेडिओ निर्मितीची कल्पना सुचली.

सध्या अनेक रेडिओ वाहिन्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असताना याचे वेगळेपण काय, असा प्रश्‍न पडू शकतो. मात्र या रेडिओ वाहिनीद्वारे पंढरीसह संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत निवृत्ती, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव आदीं मानाच्या सात पालख्या निघतात, तेथून ही वाहिनी सुरू केली जाणार आहे. याव्दारे धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, शासकीय माहिती तसेच आपत्ती निवारण आदींविषयी माहिती दिली जाणार आहे.

याबाबत धैर्यशील पाटील यांनी सातही संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही माहिती दिली आहे. त्यांनीदेखील यास तत्त्वतः मान्यता दिली असून, नुकत्याच पंढरपूरच्या मंदिर समितीसमोर त्यांनी हा आराखडा मांडला आहे. याबाबतीत मंदिर समिती पुढाकार घेणार असून, यासाठी येणारा खर्च व तांत्रिक परवानगीसाठी शासनाच्या प्रतिनिधींची भेटदेखील घेण्यात येणार आहे. यावर सर्व संत संस्थानचे प्रतिनिधी व पंढरीची मंदिर समिती यांची लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

----------

काय आहे याची उपयोगिता

पंढरीत चार प्रमुख वाऱ्या भरतात तेव्हा भाविकांना दर्शन किंवा इतर सुविधांबाबत माहिती देण्यासाठी याचा मोठा उपयोग होऊ शकतो. एखादी दुर्घटना घडल्यावर अफवा पसरतात. याबाबत शासनाची अधिकृत माहिती देण्यासाठी हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. या रेेडिओची रेंज २५ कि.मी. पर्यंत राहणार आहे. तसेच मंदिर समिती व सात मानाच्या पालखी संस्थानच्या स्वतंत्र वेबसाईट असून, याला संतवाणी रेडिओची लिंक जोडल्यास जगभरात कोठेही हे रेडिओ चॅनल ऐकणे शक्य आहे.

-----