पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत इंदापुरातील घटनेच्या निषेधार्थ माळशिरस बंद
By काशिनाथ वाघमारे | Updated: December 12, 2023 17:19 IST2023-12-12T17:18:46+5:302023-12-12T17:19:34+5:30
ओबीसी समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.

पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत इंदापुरातील घटनेच्या निषेधार्थ माळशिरस बंद
सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरील इंदापूर येथे घडलेल्या चप्पलफेक प्रकाराचा निषेध करीत माळशिरस शहरातील व्यापा-यांनी मंगळवारी दुपारपर्यंत बंद पाळला. यावेळी पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करीत सरकारने पडळकरांना वाय सुरक्षा द्यावी अशी मागणी केली.
यावेळी ओबीसी समाजातर्फे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.
यावेळी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आ. पडळकर यांना सरकारने वाय सुरक्षा द्यावी, यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याची जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी सांगितले. यावेळी संतोष वाघमोडे, बाळासाहेब सरगर, नगरसेविका रेश्मा टेळे, नगरसेवक महादेव कोळेकर, दादा शिंदे, नगरसेवक प्रवीण केमकर, गंगाधर पिसे, सुरेश टेळे, सचिन पिसे, सोमनाथ पिसे, सोमनाथ मस्के, राजाभाऊ वळकुंदे, अभिजीत पाटील, विश्वजीत पाटील, भाऊ थोरात उपस्थित होते.