शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन बनविणार

By admin | Updated: September 30, 2015 13:17 IST

पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन करण्याच्या दृष्टीने येथील सर्व विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी पंढरपूरची स्वच्छता, ४३ कोटी रुपयांचे भक्तनिवास, नदीकाठी ६५ एकर परिसरात

पंढरपूर : पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन करण्याच्या दृष्टीने येथील सर्व विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी पंढरपूरची स्वच्छता, ४३ कोटी रुपयांचे भक्तनिवास, नदीकाठी ६५ एकर परिसरात दोन-तीन निवासी कक्ष ही कामे पुढील आषाढी यात्रेच्या आतच पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भात ते आज पंढरपुरात आले होते, त्यावेळी बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, सध्या पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आराखडांतर्गत सुमारे ५३ कोटी रुपयांचे तीन महत्त्वाचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये गजानन महाराज मठ ते भक्ती मार्ग हा साडेसातशे मीटरचा रस्ता ६ कोटी ४८ लाख, एमटीडीसी भक्तनिवास ते सांगोला चौक ते मध्यप्रदेश भक्तनिवास पर्यंतचा एकोणीसशे मीटरचा रस्ता २४ कोटी ९ लाख तर संतपेठ-महात्मा फुले पुतळा ते गोपाळपूर हा अठराशे मीटरचा रस्ता २३ कोटी ५२ लाख रुपयांत करण्याचे काम सुरु असून, कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय नगरोत्थान योजनेच्या ५२ कोटी रुपयांतून आणखी महत्त्वाचे आठ रस्ते प्रगतिपथावर आहेत. (प्रतिनिधी)