शेतकºयांना स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापुरात किसान कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 15:34 IST2018-04-26T15:34:37+5:302018-04-26T15:34:37+5:30
शासन आपल्या दारी उपक्रम, शेतकºयांना उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प

शेतकºयांना स्वावलंबी बनवण्यासाठी सोलापुरात किसान कार्यशाळा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पीक उत्पादकता वाढवून शेतकºयांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभावे त्यांनी स्वावलंबी बनावे यासाठी बुधवारी २ मे २०१८ रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली.
कृषी संलग्न विभागाच्या योजनांची शेतकºयांना माहिती अवगत असणे गरजेचे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प आहे. कृषी व संलग्न विभागाकडील योजनांची माहिती शेतकºयांना मिळावी यासाठी ही कार्यशाळा आयेजित केली आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट व्हावे, शेतकºयांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि शेतकरी स्वयंनिर्भर होण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहेत. कृषी विभागाकडील विविध योजनांची एकत्रित माहिती शेतकºयांमार्फत पोहोचत नसल्यामुळे अनेक शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. हे टाळण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.
किसान कल्याण कार्यशाळेत कृषी, आत्मा, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, जलसंधारण, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र या विभागांकडील योजनांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी तालुक्यांचे लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, प्रगतिशील शेतकरी, कृषी सहायक, शेतकरी मित्र यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार व आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी केले आहे.
तालुक्यात गटस्तरावर किसान कल्याण दिवस
- शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर शेतकºयांच्या हितासाठी तसेच शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या केंद्र व राज्य शासनाकडून राबवल्या जाणाºया योजनांची माहिती शेतकºयांपर्यत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात गटस्तरावर किसान कल्याण दिवस आयोजित केला जात आहे. यावेळी कृषी विभागाकडील योजनांची माहिती पत्रकाच्या स्वरुपात जिल्हा व तालुका स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या शेतकºयांची पीकनिहाय यशोगाथा दाखवण्यात येणार आहे. तसेच विविध विभागातील योजनांची माहिती शेतकºयांना दिली जाणार आहे.