शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मका, तेल, दूध भुकटी अध्यादेशाची केली होळी

By दिपक दुपारगुडे | Updated: June 30, 2024 20:37 IST

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात स्वाभिमानी रस्त्यावर

सोलापूर: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. या अन्यायकारक अध्यादेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या केंद्राच्या निर्णयाचा परिणाम थेट दूध, मका आणि तेलबियांच्या दरावर होणार आहे. दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयातीमुळे भुकटीचे भाव कमी झाले आहेत.

या निर्णयामुळे दूध दरातही तीन ते चार रुपयांपर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत केंद्राचा अध्यादेश जाळण्यात आला. केंद्र सरकारने १० हजार टन दूध भुकटी ५ लाख टन, मका ३ लाख, कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला. या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यादेशाची होळी करण्यात आली. यावेळी सचिन शेंडगे, तुकाराम काळे, सुदाम शेंडगे, दादासाहेब काळे, उमेश भाकरे, तात्यासाहेब काळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.---केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तत्काळ मागे घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.- अजित बोरकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Solapurसोलापूर