महेश शेंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:28 IST2021-09-07T04:28:15+5:302021-09-07T04:28:15+5:30

कुर्डूवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुर्डूवाडी पंचायत समिती बांधकाम विभागातील महेश मधुकांत शेंडे ...

Mahesh Shende honored with Lifetime Achievement Award | महेश शेंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

महेश शेंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

कुर्डूवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुर्डूवाडी पंचायत समिती बांधकाम विभागातील महेश मधुकांत शेंडे यांचा महाराष्ट्र राज्य वीरशैव शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी कल्याणकारी मंडळाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सोलापुरात डॉ. निर्मल कुमार फडकुले सभागृहात महेश शेंडे यांनी लेखापरीक्षणात उत्कृष्ट कामकाज केले आहे. खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, नगरसेवक प्रशांत धुत्तरगावकर, महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे, राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते, अध्यक्ष शिवानंद भरले, बसवराज दिंडिरे उपस्थितीत होते. या जीवनगौरव पुरस्काराबाबत आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे, गटविकास अधिकारी संताजी पाटील, उपअभियंता एस. जे. नाईकवाडी यांनी कौतुक केले आहे.

----

फोटो : ०६ महेश शेंडे

महेश शेंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, उमेश पाटील

Web Title: Mahesh Shende honored with Lifetime Achievement Award