Maharashtra's brightness is limited to Mumbai: Subhashini Ali | महाराष्ट्राची चमक-धमक मुंबईपुरती मर्यादित : सुभाषिनी अली

महाराष्ट्राची चमक-धमक मुंबईपुरती मर्यादित : सुभाषिनी अली

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरातसुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत

सोलापूर : महाराष्ट्रात शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे़ या आत्महत्या मागील सरकारच्या चुकांमुळे होत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे अत्यंत निंदनीय आहे. नोटाबंदीने कोणाचा फायदा झाला आणि भारताला याचा काय फायदा झाला, हे सरकारला सांगता आले नाही. एकीकडे सरकार म्हणते बँकेत खाते उघडा आणि दुसरीकडे बँकेतील व्यवहारावर सरकार मर्यादा घालते, हे कशाचे लक्षण आहे़ महाराष्ट्रात आज अनेक समस्या आहेत पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे़ महाराष्ट्राची चमक-धमक केवळ मुंबईपुरती मर्यादित आहे, असा टोला माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी लगावला.

सध्या ईव्हीएममध्ये घोळ आहे़, असे मी काही प्रमाणात मानते़ पण याच मशीनच्या साहाय्याने भाजपने लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत, असे म्हणता येणार नाही़ कारण दक्षिण राज्यात भाजपला फारसे यश मिळाले नाही़ सध्या निवडणूक आयोगाकडून लोकशाहीला धोका आहे़ आयोगाकडून निष्पक्ष आणि निर्भीड वातावरणात निवडणुका होणे गरजेचे आहे़ तसे होत नाही़ निवडणूक आयोगाची स्वायत्तता संपली असून, आयोगाची स्वायत्तता आता भाजपच्या हाती असल्याची टीका माजी खासदार तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या सुभाषिनी अली यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सुभाषिनी अली या सोलापुरात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़  यावेळी त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षांवर सडकून टीका केली़ सुभाषिनी अली या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमधील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल यांच्या कन्या आहेत.

त्या म्हणाल्या, आजच्या निवडणुका हे कशाच्या आधारावर होत आहेत़ तर राममंदिर, पाकिस्तानीचा द्वेष आणि ३७० कलम रद्द या विषयावर होत आहेत, हे चुकीचे आहे़ सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर निवडणुका होणे अपेक्षित आहे़ सरकार याकडे लक्षच देत नाही़ दुर्दैवाची बाब म्हणजे सध्या संसदेत मजबूत विरोधी पक्षदेखील अस्तित्वात नाही़ राज्यात अनेक महिन्यांपासून दुष्काळ असून, यामुळे लोकांचे हाल होताहेत़ जनावरे मरताहेत़ यावर वेळीच उपाययोजना करणे सरकारचे काम आहे़ मात्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे़ पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या सध्यस्थितीवरदेखील अली यांनी भाष्य करत यास फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.

Web Title: Maharashtra's brightness is limited to Mumbai: Subhashini Ali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.