शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 05:27 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळी खोदून शेतकरी पस्तावले आहेत.

सोलापूर : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत शेततळी खोदून शेतकरी पस्तावले आहेत. शेततळ्याचे अनुदानही मिळत नाही व पाऊस नसल्याने शेततळ्यात पाणीही येत नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात पूर्ण असलेल्या ६४० शेततळ्यांसाठी ३२० लाख रुपयाची मागणी कृषी कार्यालयाने केली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकोपयोगी योजना म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ची योजना जाहीर केली होती. दरवर्षीच पावसाची हुलकावणी सुरू असल्याने शेततळ्यांची शेतकऱ्यांना गरजही निर्माण झाली आहे. उसासारख्या पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असल्याने व साखर कारखान्यांकडून दरही म्हणावा तसा मिळत नसल्याने शेतकरी फळबागा, ढोबळी मिरची व अन्य नगदी पिकांकडे वळला आहे. या पिकांसाठी शेततळ्यांचे पाणी पुरेसे होत असल्याने प्रत्येकाला शेततळे खोदावे असे वाटत आहे. मात्र त्यासाठी शासनाचे मिळणारे तुटपुंजे अनुदानही मिळेना झाले आहे. मागील दोन-तीन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यासाठी अनुदान मिळाले नाही. तब्बल ६४० शेततळी खोदून पूर्ण झाली असून त्यासाठी तालुका स्तरावरुन ३२० लाख रुपयाची मागणी केली आहे. गरज म्हणून तसेच शासनाने जाहीर केल्यामुळे आॅनलाईन अर्ज करुन कृषी खात्याची रितसर मंजुरी घेवून खोदलेल्या शेततळ्यांचेही अनुदान मिळेना झाले आहे. मागील वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेततळ्यांची मागणी वाढली. याही वर्षी पाऊस म्हणावा तितका पडला नसल्याने शेततळी कोरडी पडली आहेत तर खोदलेल्या तळ्यांचे पैसेही मिळत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे.करमाळा तालुक्यात सर्वाधिक शेततळीउत्तर सोलापूर-४१ शेततळी २०.५० लाख, दक्षिण सोलापूर- २३ शेततळी ११.५० लाख, मोहोळ-५६ शेततळी २८ लाख, अक्कलकोट- ३८ शेततळी १९ लाख,पंढरपूर-१३१ शेततळी ६५.५० लाख, सांगोला- ३४ शेततळी १७ लाख,मंगळवेढा १४ शेततळी ७ लाख,माळशिरस-१०७ शेततळी ५३.५० लाख, बार्शी- २२ शेततळी ११ लाख, माढा- १२१ शेततळी ६०.५० लाख, करमाळा- २९४ शेततळी १४०.८८ लाख रुपये.>निधी मिळण्यासाठी पाठपुरावासुरू आहे. शासनाकडून अनुदान मिळणार आहे हे नक्की आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळण्यास विलंब लागत आहे. येत्या आठवड्यात अनुदान येण्याची शक्यताआहे.- बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस