शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 04:10 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

सोलापूर: भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. म्हेत्रे यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार म्हेत्रे आणि आमदार शिंदे यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हेत्रे यांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या तर आमदार शिंदे यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात राहायला सांगण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. या विरोधावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती. आमदार म्हेत्रे आणि आमदार शिंदे यांनी मुंबईत तळ ठोकला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. दोघांच्या प्रवेशासाठी २२ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.भालकेंचे ठरलेकाँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तूर्तास त्यांना थांबण्यास सांगितले आहे. ही जागा यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याला होती.

टॅग्स :BJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019