कौटगीमठ लिखित पुस्तकातील महाराष्ट्र ६८ प्रश्नांचा सेट परीक्षेत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:33+5:302020-12-30T04:29:33+5:30
बऱ्हाणपूर : अक्कलकोटचे शिक्षक धानय्या कौटगीमठ यांनी सेट-नेटवर आधारित स्वानुभवातून पुस्तक तयार केले आहे. महाराष्ट्र सेट परीक्षेत तब्बल ...

कौटगीमठ लिखित पुस्तकातील महाराष्ट्र ६८ प्रश्नांचा सेट परीक्षेत समावेश
बऱ्हाणपूर : अक्कलकोटचे शिक्षक धानय्या कौटगीमठ यांनी सेट-नेटवर आधारित स्वानुभवातून पुस्तक तयार केले आहे. महाराष्ट्र सेट परीक्षेत तब्बल ५७ प्रश्न तर आंध्र प्रदेशमध्ये ६० प्रश्न कौटगीमठांच्या पुस्तकातून विचारले गेले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी महाराष्ट्र व गोवा दोन राज्यांसाठी २७ डिसेंबर रोजी सेट परीक्षा घेतली. या परीक्षेत ३२ विषयांवर १५ केंद्रांत व आंध्र प्रदेशामध्ये २० डिसेंबर रोजी ३० विषयांवर राज्यातील आठ केंद्रांत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत अक्कलकोट येथील शिक्षक धानय्या कौटगीमठ यांच्या पुस्तकातील महाराष्ट्रात पेपर क्रमांक १ मध्ये ५० प्रश्नांपैकी ९ आणि इंग्रजी विषयात १०० प्रश्नांपैकी ४८ प्रश्न असे एकूण ५७ प्रश्न तर आंध्र प्रदेशमध्ये पेपर १ मध्ये ५० पैकी १६ प्रश्न आणि इंग्रजीमध्ये १०० पैकी ४४ प्रश्न असे एकूण ६० प्रश्न विचारले गेले आहेत. या वर्षी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांतही कौटगीमठ लिखित पुस्तकातील सरासरी ६० पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले आहेत. (वा. प्र.)
फोटो : २९ धानय्या कौटगीमठ.