शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

गावांपाठोपाठ आता महाराष्ट्र निर्मलग्राम

By admin | Updated: July 10, 2014 01:22 IST

पृथ्वीराज चव्हाण: पुणे-पंढरपूर स्वच्छता दिंडीचा समारोप

पंढरपूर : देशात निर्मलग्राम अभियानात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लवकरच गावांपाठोपाठ संपूर्ण राज्य निर्मलग्राम होणार असून, याचा सर्वप्रथम मान कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे. यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे ते पंढरपूर स्वच्छता दिंडी काढण्यात आली होती. स्वच्छता दिंंडी व ग्रामसभा दिंडीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, नगराध्यक्षा उज्वला भालेराव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती पुष्पा जाधव, उपसभापती विष्णू बागल, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे, माऊली हळवणकर, संतोष सुळे, महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड आदी उपस्थित होते.शौचालय बांधण्यासाठी शासन प्रत्येकाला ९१०० रूपये अनुदान देत आहे. निर्मलग्राम मध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकणात चांगली प्रगती आहे परंतू विदर्भ, मराठवाडा भागात चांगली स्थिती नाही, तेथे अधिक लक्ष दिले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लोककलेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. पाणीपुरवठा व ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रभावी जनजागृतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला यश येत असल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.पालकमंत्री सोपल म्हणाले, लोककलावंताच्या माध्यमातून या सोहळयातील भाविकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न लोककलावंत करतात. घर तेथे शौचालय हा कार्यक्रम शासनाचा न राहता तो लोक चळवळीतून उभारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपूर्ण देशात महाराष्ट्राचा स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचा क्रमांक पहिला असून जलस्वराज्य टप्पा - २ साठी संपूर्ण देशात महाराष्ट्राची निवड जागतिक बॅकेने याच निकषावर केली असल्याचेही सोपल यांनी सांगितले.---------------------राज्याला तीन कोटींचा पुरस्कारग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शासनाचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या दिंडीतील कलाकारांनी केलेले आहे. लोककला ही अतिशय प्रभावी माध्यम आहे. स्वच्छता अभियान व निर्मल अभियान यामध्ये राज्याचे देशात योगदान महत्वाचे आहे. यामुळे पंचायत राज्य व्यवस्थेचा ग्रामविकास विभागाला केंद्र शासनाचा ३ कोटी रुपयाचा पुरस्कार राज्याला मिळाला.