शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये

By appasaheb.patil | Updated: April 24, 2024 11:32 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ मरिआई चाैकातील एक्झिबिशन ग्राउंडवर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा हाेणार आहे.

- आप्पासाहेब पाटीलसाेलापूर -  काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ मरिआई चाैकातील एक्झिबिशन ग्राउंडवर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा हाेणार आहे. यासोबतच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांची मोडनिंब येथे सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे. दुपारी सव्वा वाजता अरण येथे संत सावता माळी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचे मोहोळकडे प्रयाण होणार आहे. दुपारी २.४५ वाजता मोहोळमध्ये जाहीर कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी विमानाने लातूर विमानतळावर उतरतील. लातूरहून चाॅपरने केगाव येथील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात तयार केलेल्या हेलिपॅडवर येतील. येथून त्यांचा ताफा एक्झिबिशन ग्राउंडवर येईल. या मैदानावर साेलापूर, माढा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बसण्याची साेय करण्यात आली आहे. मैदानाच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. राहुल गांधी यांच्या सभेची तयारी झाली असून हजारो काँग्रेस कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सभेसाठी गर्दीचा विचार करता सोलापूर शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. केगांव सिंहगड कॉलेजपासून बाळे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीवेस पोलिस चौकी, भैय्या चौक, दमाणी नगरात मोठा पेालिस बंदोबस्त सकाळपासून तैनात केला आहे. सभास्थळावरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी सभेच्या नियाेजनाचा आढावा घेतला. सभेला विक्रमी गर्दी हाेईल, असा दावाही काॅंग्रेस नेत्यांनी केला. लाेकसभा निवडणुकीसाठी आजवर स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, स्व. पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रीय नेत्या साेनिया गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. राहुल गांधी यांनीही यापूर्वी पंढरपूरमध्ये जाहीर सभा घेतली हाेती. आता पुन्हा ते साेलापूर, माढा मतदारसंघाच्या प्रचारासाठी येत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस