महाराष्ट्र सरकारचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद, भाजप सरकार ढोगी - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:07 PM2017-12-18T12:07:39+5:302017-12-18T12:09:12+5:30

भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे.

Maharashtra Government's approach to looking at the cooperative is suspicious, BJP government is happy- Ajit Pawar | महाराष्ट्र सरकारचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद, भाजप सरकार ढोगी - अजित पवार

महाराष्ट्र सरकारचा सहकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन संशयास्पद, भाजप सरकार ढोगी - अजित पवार

googlenewsNext
ठळक मुद्देसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरणदीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत


आॅनलाइन लोकमत सोलापूर
अकलूज दि १८ : भाजपा सरकार हे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी साजरी करतेय. यात सरकारचे मोठेपण नसून सहकार महर्र्षींचे मोठेपण आहे. आज सहकार संक्रमणावस्थेतून जात आहे. कारण सहकाराकडे बघण्याचा भाजप सरकारचा दृष्टिकोन संशयास्पद असून हे सरकार ढोंगी असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जलसंपदा मंत्री व राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. विजयसिंंह मोहिते-पाटील, आ़ दत्तात्रय भरणे, आ़ दीपक चव्हाण, आ़ नारायण पाटील, आ़ बबनराव शिंंदे, आ़ हनुमंत डोळस, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आ़ विनायकराव पाटील, धनाजी पाटील, माजी खा़ रणजितसिंंह मोहिते-पाटील, माजी जि. प. अध्यक्ष फत्तेसिंंह माने-पाटील, मदनसिंंह मोहिते-पाटील, राजूबापू पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, जि. प. सदस्या स्वरूपराणी मोहिते-पाटील, राष्टÑवादीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, तालुकाध्यक्षा फातिमा पाटावाला, रमेश बारसकर, उमेश पाटील, विक्रांत माने, प्रकाश चवरे उपस्थित होते. प्रारंभी स़ म़ साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंह मोहिते-पाटील यांनी प्रास्ताविक केले. 
यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, राज्याच्या समृध्दीला सहकाराच्या चळवळीने हातभार लावला, विकासाचा पाया रचला. ग्रामीण भागाला खºया अर्थाने विकासाची ओळख सहकार चळवळीनेच करून दिली. यामध्ये सर्वात मोलाचा वाटा असेल तर तो सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा. आज भाजपा सरकार सहकाराच्या मुळावर उठले आहे. बाजार समिती, साखर कारखानदारी व इतर अनेक सहकारी संस्था कशा अडचणीत येऊन मोडीत निघतील, याकडे सरकार लक्ष पुरवते आहे. हे सरकार फसवे आहे. धनगर, मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देतो म्हणून या सरकारने फसवले आहे. समित्या, चौकशा आणि अभ्यास या गोंडस नावाखाली सरकारने लोकांना उल्लू बनवले असल्याचे ते म्हणाले. 
सुनील तटकरे म्हणाले, निकष आणि तत्वत: या शब्दांचा घोळ घालून सरकारने शेतकºयांना कर्जमाफी प्रकरणात फसवले आहे. आयात आणि निर्यातीचे चुकीचे धोरण राबवून शेतकºयांचे खच्चीकरण केले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची जन्मशताब्दी जर सरकारला प्रामाणिकपणे साजरी करायची असेल तर त्यांनी शेतकºयांना फसवणे बंद केले पाहिजे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाºया उजनीच्या पाणी वाटपाचा तिढा सोडवून शेतकºयांना पाणी टंचाईतून वाचवले पाहिजे. 
-------------------
दीड महिन्यात साखरेचे दर ६०० रूपयाने पाडले
- सरकारची साखर कारखानदारीबद्दलची धोरणे चुकीची आहेत. गतवर्षी सरकारने गरज नसताना ८ लाख मे. टन साखर आयात केली; मात्र देशातील साखर निर्यात करताना ते सवलत देत नाहीत. कारखाने सुरू होऊन दीड महिना झाला नाही. ३ हजार ७०० रूपयांवरची साखर आज ३ हजार १०० रूपयांवर येऊन ठेपली आहे. असेच जर चालू राहिले तर साखर कारखाने मोडीत निघतील, असे अजित पवार यांनी सांगितले़

Web Title: Maharashtra Government's approach to looking at the cooperative is suspicious, BJP government is happy- Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.