शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 16:39 IST

प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही

सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागलेले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असं वक्तव्य करुन सुशीलकुमार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे संकेत दिलेत. सोलापूरच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला आहे. 

यावर बोलताना राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशात हिटलरशाही वाढतेय, शिवसेनेनेही सामना अग्रलेखातून हीच भूमिका मांडली आहे, त्यामुळे देशातील हिटलरशाहीविरोधात सर्व पक्ष एकत्र आले तर चांगलेच आहे. जातियवादी शक्तींना रोखण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मात्र राष्ट्रवादीचं विलीनीकरण यावर भाष्य करणं जितेंद्र आव्हाडांनी टाळलं. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीहीभाजपा-शिवसेना या जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच ऊर्जा आहे. आगामी निवडणुकीत चमत्कार नक्की दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याची चर्चा सुरु होती. मात्र राष्ट्रवादीकडून विलीनीकरणाचं वृत्त तेव्हा फेटाळून लावलं होतं. देशातील वातावरण एकाच पक्षाच्या बाजूने वाहत असताना राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावं असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मत मांडले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील सर्व नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे स्वत:चे अस्तित्व असून ते अस्तित्व कायम ठेवणार आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहन राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केलं होतं.  

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019