शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Maharashtra Assembly Election 2024 : पहिल्याच दिवशी सोलापूरात नेत्यांची गडबड! सुभाषबापू, माने, मास्तर, तौफिक, शाब्दी यांनी घेतला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 14:01 IST

माढा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली.

शहर उत्तर : भाजप, काँग्रेसकडून घेतले अर्ज शहर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी युवराज चंद्रकांत निबोळे, श्रीशैल बनशेट्टी यांनी भाजपकडून २ तर अपक्ष म्हणून २, राजू शिंदे, गुरुशांत मोकाशी, बसवराज चडचण, नागमणी जक्कन, रुपेशकुमार भोसले, मारुती सावंत, हाजीअली शेख, उमेश काळे यांनी अर्ज विकत घेतला. तर ब्ल्यू इंडिया पार्टीकडून दत्तात्रय थोरात, सुमित भांडेकर, एमआयएमकडून मोसीन बागवान, उद्धव ठाकरे गटाकडून शिवपुत्र बिराजदार, काँग्रेसकडून सुभाष वाघमारे, खंडू धडे, काँग्रेसकडून सुनील रसाळे यांनी अर्ज विकत घेतला आहे. शहर मध्य : मास्तर, शाब्दी, मिस्त्रींचे अर्ज शहर मध्य विधानसभेसाठी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, एमआयएमचे शहराध्यक्ष फारूख शाब्दी, काँग्रेसचे बाबा मिस्त्री, वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत गोणेवार, तौफिक शेख, अंबादास करगुळे, शिंदे गटाचे प्रमोद मोरे, संदीप आडके यांच्यासह ३६ जणांनी अर्ज घेतले. अपक्ष म्हणून अर्ज घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

माढा : पुण्याचे बबन शिंदे उमेदवारीसाठी 

माढा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिली. आ. बबनराव शिंदे यांच्यासाठी व त्यांचे सुपुत्र रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्यासाठी अपक्ष व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अर्ज नेण्यात आले आहेत. माजी सभापती शिवाजी अंबादास कांबळे यांच्यासह माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील नेत्यांनी ३० अर्ज घेतले आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सिद्धेश्वर लक्ष्मण वाघमारे यांच्याकडून बबन विठ्ठल शिंदे सोनेवाडी (ता. दौंड, जि. पुणे) यांच्यासाठी अर्ज घेतला आहे. माढा तालुक्यातील चिंचगाव येथील संजय विठ्ठल शिंदे यांनी अपक्ष अर्ज घेतला.

सोलापूर: जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज विक्री व भरण्याच्या पहिल्या दिवशी दिग्गज नेत्यांची लगबग पाहायला मिळाली. जिल्ह्यातील आ. बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे या दोघांनी माढ्यासाठी अर्ज घेतले. शिवाय सांगोल्यातून सागाल्य आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, मोहोळमधून आ. यशवंत माने, माजी आमदार रमेश कदम, पंढरपूरमधून मनसेचे दिलीप धोत्रे यांच्यासह दिग्गजांनी उमेदवारी अर्ज घेतले. दि. २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस निवडणूक कार्यालयात नेत्यांची गर्दी पाहायला मिळणार आहे.

माळशिरस : पहिला दिवस निरंक 

माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात मंगळवारी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नसून, पहिला दिवस निरंक ठरला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांनी दिली. माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी सुजयनगर १ अकलूज येथील प्रांत कार्यालयात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात साहित्य ठेवण्यात येणार आहे. अकलूजला निवडणूक प्रक्रिया प्रथमच पार पडत आहे.

दक्षिण सोलापूर : सुभाष देशमुखांसाठी अर्ज 

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मनीष देशमुख (माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या तर्फे), माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री माजी नगरसेवक तौफिक शेख, सोमनाथ वैद्य, उमेश काळे, बाबा मिस्त्री, संगमेश्वर काडादी, बाळासाहेब बंडगर, आप्पासाहेब पाटील, सचिन गायकवाड, सचिन परमशेट्टी, दौलत शिंदे, चंद्रकांत रबाडे, मनोहर गायकवाड, सिद्धार्थ बनसोडे, मनीष गायकवाड, प्रशांत कांबळे, शशीकांत माळी, राघवेंद्र चाबुकस्वार, बबन कांबळे आदींनी अर्ज नेले. पुढील दोन दिवसात अनेकजण अर्ज दाखल करतील. 

अक्कलकोट : वंचित, रासप, आरपीआयने घेतले अर्ज 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात वंचितकडून पहिल्या दिवशी संतोषकुमार इंगळे व चंद्रशेखर मडिखांबे यांनी अर्ज घेतले आहेत. याशिवाय रासपकडून सुनील बंडगर, दत्तात्रय माडकर, आरपीआय आठवले गटाचे अविनाश मडिखांबे, बसपचे विठ्ठल आरेनवरु, एमआयएमचे मौलाली पठाण आदींनी अर्ज घेतले.

पंढरपूर : काँग्रेस अन् पवार गटाने घेतले अर्ज

 मंगळवारी बहुजन समाज पार्टीकडून भालचंद्र कांबळे (१), आम आदमी पार्टी : निशिकांत बंडू पाटील (१), जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी: नामदेव शाखाप्पा थोरबोले (१), राष्ट्रवादी (शरद पवार गट) : वसंतराव दौलतराव देशमुख (२), अनिल सुभाष सावंत (१), शैलजा अनिल सावंत (१), मनसे : दिलीप काशिनाथ धोत्रे (१), इंडियन नॅशनल काँग्रेस : राजेंद्र निवृत्ती मोरे (१), अपक्ष (२०) 

सांगोला : जरांगे पाटील समर्थकांनी घेतले अर्ज 

सांगोला येथे एकही अर्ज दाखल झाला नाही. आ. शहाजीबापू पाटील यांनी ४, त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांनी ४, दीपक साळुंखे-पाटील यांनी ८, श्रीकांत देशमुख यांनी ४ व शशिकांत देशमुख ४, डॉ. अनिकेत देशमुख १, मनोज जरांगे पाटील यांच्यातर्फे दत्तात्रय टापरे, विनोद बाबर-२, डॉ. परेश खंडागळे, कुंदन बनसोडे-४, हरिभाऊ पाटील, उमेश मंडले, डॉ. सुदर्शन घेरडे, राजाराम काळेबाग आदींनी अर्ज घेतले.

बार्शी : एकाने भरली अनामत रक्कम 

बार्शी विधानसभेसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. एका उमेदवाराने अनामत रक्कम भरली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल आणि जरांगे पाटील समर्थक माजी सभापती युवराज काटे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले गेले आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख म्हणाले की, पहिल्या दिवशी विनोद जाधव, रविशंकर गोदने, विकास जाधव, आनंद काशीद, वर्षा कांबळे, मधुकर काळे, किशोर गादेकर, मोहसीन तांबोळी, किशोर देशमुख, अरबाज पठाण, आनंद यादव या बारा जणांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर राष्ट्रीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष विकास जाधव यांनी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी अर्ज नेला आहे. युवराज काटे यांच्यासाठी खामगावच्या हर्षद मुठाळ यांनी अर्ज नेला आहे.

करमाळा : दोघांनी दाखल केली उमेदवारी

करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी अशोक ज्ञानदेव वाघमोडे (रा. निलज, ता. करमाळा) यांनी न्यू रासप या पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर बाळासाहेब मच्छींद्र वळेकर (रा. निंभोरे, ता. करमाळा) यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Solapurसोलापूर