शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 09:02 IST

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातदेखील एकनाथ शिंदे सरकार पाठीमागील दाराने आले. कर्नाटकात काँग्रेस सरकारची योजना खोटी निघाली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

मंगळवेढा : भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, त्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. कर्नाटकात काँग्रेस सरकारने राबविलेल्या योजनेबाबत खोटी माहिती पसरवण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. शनिवारी (दि.१६) मंगळवेढा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. प्रणिती शिंदे, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, उमेदवार भगीरथ भालके आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सामान्य जनतेचे जीवन सुखकर, असे खोटे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची कर्जमाफी न देता, फक्त भांडवलदारांची कर्जमाफी केली.

कर्नाटकात कर्जमाफी मागितल्यावर भाजप सरकारने नोटा छापायची मशीन आहे का, असे सांगून टाळले; पण मी मुख्यमंत्री झाल्यावर ८५०० कोटींची कर्जमाफी दिली. 'ऑपरेशन कमळ'साठी आमदार खरेदीसाठी कोट्यवधी रुपये आले कुठून आले. महाराष्ट्रातदेखील एकनाथ शिंदे सरकार पाठीमागील दाराने आले. कर्नाटकात काँग्रेस सरकारची योजना खोटी निघाली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

याचबरोबर, आता ३६५ कोटी महिलांना मोफत एसटी प्रवास सुरू केलाय. गृहज्योती, युवानिधी योजना सुरू केल्या. यासाठी ५६ हजार कोटींची तरतूद करून ठेवलीय. ज्या राज्यात भाजप सत्ता आहे, त्या ठिकाणी या योजना आणल्या का? भाजपने भांडवलदारांचा विचार केला. सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी महागाई वाढवून ठेवली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर केला.

महायुतीचे सरकार नसून महाभीती सरकार आहे : प्रणिती शिंदेमला खासदार केल्यामुळे तुमचं माझं नातं शेवटच्या श्वासापर्यंत आहे. कामाचा वारसा कायम ठेवू तळागाळात काम करणाऱ्याला संधी दिली. भाजप सरकारचे हे फक्त शासन निर्णयाचे सरकार असून, महायुतीचे सरकार नसून महाभीती सरकार आहे, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. तर उमेदवार भगीरथ भालके म्हणाले की, विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांची दिशाभूल करत तीन हजार कोटींचा निधी आणला, असे सांगता पण सध्या गावोगावच्या रस्त्याची अवस्था बघण्यासारखी झालीय, महाविकास सरकारने जाहीरनाम्यात पंचसूत्रीद्वारे लोकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४siddaramaiahसिद्धरामय्याpandharpur-acपंढरपूरcongressकाँग्रेसBJPभाजपा