महाराजाकडून गावची बदनामी.. ग्रामस्थ भडकले; अंधश्रद्धेला कदापिही सपोर्ट नाही.. नेतेही बोलले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:47+5:302021-09-02T04:48:47+5:30
......... ईडीमार्फत चौकशी करावी दहा वर्षांपूर्वी कुडाच्या झोपडीत राहून पूजा-बिजा बांधणाऱ्या मनोहरचा एवढ्या मोठ्या आश्रमाचा महाराज कसा झाला, कोट्यवधीची ...

महाराजाकडून गावची बदनामी.. ग्रामस्थ भडकले; अंधश्रद्धेला कदापिही सपोर्ट नाही.. नेतेही बोलले !
.........
ईडीमार्फत चौकशी करावी
दहा वर्षांपूर्वी कुडाच्या झोपडीत राहून पूजा-बिजा बांधणाऱ्या मनोहरचा एवढ्या मोठ्या आश्रमाचा महाराज कसा झाला, कोट्यवधीची संपत्ती कशी आणि कुठून गोळा केली, याची सरकारने ईडीमार्फत चौकशी करावी. आम्ही हाडाचे शेतकरी आहोत. भिकारी नाहीत याची जाण ठेवावी.
धनंजय कांबळे, ग्रामस्थ उंदरगाव.
.......
मनोहरकडून ग्रामस्थांची बदनामी
पार्किंगसाठी तासाला २०० रुपये दयावेत, याचा रोष मनात असल्याने गावकऱ्यांकडून विरोध होतोय, असा खोटा आरोप पत्रकार परिषदेत केला गेला. ग्रामस्थांची बदनामी केल्याबद्दल आम्ही गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.
ॲड. मनोजकुमार कांबळे, उंदरगाव
..........
अंधश्रद्धेला खतपाणी नको
अद्याप माझ्याकडे तक्रारी आलेल्या नाहीत. तसं काही झालं असेल तर त्या तक्रारीची शहानिशा करू. अंधश्रद्धेला खतपाणी घालणं योग्य नाही.
आ. संजयमामा शिंदे, आमदार करमाळा-माढा.
.......
गैरफायदा घेऊ नका
हा ज्याच्या त्याच्या भावनेचा विषय आहे. या भावनेचा आदर व्हावा, एवढीच माफक अपेक्षा; पण गैरफायदा घेऊन माणसांच्या भावनेशी कोणी खेळू नये. माझा व महाराजांचा संपर्क आलेला नाही.
दिग्विजय बागल, चेअरमन, मकाई कारखाना.
........
कोणी कितीही मोठा असो..
करमाळा पोलीस ठाण्यात रवींद्र म्हेत्रे व रेखा लोंढे या दोन तक्रारदारांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. कोणी कितीही मोठा असला तरी कायद्याच्या पुढे सर्व समान आहेत. सत्यता आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.
- सूर्यकांत कोकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, करमाळा.
........
भोंदूबाबापासून सावध राहा
परमेश्वर आहे तो परमेश्वर तुम्ही स्वत:मध्ये शोधा व पहा. तुमचा भ्रमनिरास करतील अशा महाराज व बाबांकडे जाऊ नका. ते तुम्हाला नैराश्याच्या दरीत ढकलतील, म्हणून अशा भोंदूबाबांपासून सावध राहा.
जयवंतराव जगताप, माजी आमदार.
.......
मला मात्र अनुभव आलाय
मी स्वत: या महाराजांकडे जातो. मी अनेक प्रश्न या महाराजांपुढे मांडले व महाराजांच्या आशीर्वादाने माझी प्रगती झाली. मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवावरून महाराजांना दिव्यदृष्टी आहे.
- नारायण पाटील, माजी आमदार.
..........
नेत्यांनाही धडा शिकवा
अशा भोंदूगिरीला वरिष्ठ नेतेमंडळी खतपाणी घालतात. स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायद्यासाठी हे नेते बुवाबाजीचे समर्थन करतात. बुवाला संरक्षण देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. भोंदूगिरीला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही जनतेनेच धडा शिकवला पाहिजे.
- महेश चिवटे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना
.....
टीप : प्रतिक्रिया देणाऱ्यांचे फोटो पाठवत आहे. ते घ्यावेत.