चंद्रयान-3 माेहिमेसाठी भाजप कार्यकर्त्यांची सिध्देश्वर मंदिरात महाआरती
By राकेश कदम | Updated: August 23, 2023 16:18 IST2023-08-23T16:17:22+5:302023-08-23T16:18:17+5:30
महाआरतीनंतर भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता.

चंद्रयान-3 माेहिमेसाठी भाजप कार्यकर्त्यांची सिध्देश्वर मंदिरात महाआरती
इस्त्रोच्या चंद्रयान -3 मोहिमेच्या यशस्वीतेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साेमवारी दुपारी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिरात महाआरती करुन प्रार्थना केली. महाआरतीनंतर भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जयघोषात मंदिर परिसर दुमदमून गेला होता.
भाजप कार्यकर्त्यांच्या हातात हम होंगे कामयाब, मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है असे पोस्टर झळकत हाेते. यावेळी
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील, प्रा.गजानन धरणे, भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष महेश देवकर, नगरसेवक अमित पाटील, संपदा जोशी, अमर बिराजदार, यतीराज होनमाने, प्रभाकर पडवळकर, आनंद बिराजदार, दत्ता नडगिरी, सतीश पारेली, संदीप काशीद, अरविंद गवळी, विशाल जाधव, श्रीशैल स्वामी, अमित पाटील, परमेश्वर माळगे, श्रीनिवास बुरुडकर, राहुल वाघमोडे, सोमनाथ केंगनालकर, विशाल बनसोडे, भीमाशंकर पदमगोंडा, महेश अगरगुंडगी, डोंगरेश चाबुस्कवार, सतीश पारेली आदी उपस्थित हाेते.