माढा रोटरीने दिली दिव्यांगास सायकल, महिलेस पिठाची गिरणी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:28+5:302021-06-16T04:30:28+5:30

माढा रोटरी क्लब २०२० - २१ या वर्षातील डी. जी. व्हिजिट ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. क्लबचे अध्यक्ष प्रा. अशोक ...

Madha Rotary donates a bicycle to Divyanga, a gift to a flour mill for women | माढा रोटरीने दिली दिव्यांगास सायकल, महिलेस पिठाची गिरणी भेट

माढा रोटरीने दिली दिव्यांगास सायकल, महिलेस पिठाची गिरणी भेट

माढा रोटरी क्लब २०२० - २१ या वर्षातील डी. जी. व्हिजिट ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. क्लबचे अध्यक्ष प्रा. अशोक लोंढे यांनी प्रास्ताविकात माढा रोटरी क्लबच्या स्थापनेपासून आढावा मांडला. हरीशजी मोटवानी यांनी माढा रोटरी क्लबने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. माढा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाष पाटील यांनी रोटरी फाउंडेशनला ४१,००० हजारांची देणगी जाहीर केली.

या कार्यक्रमासाठी डॉ. सुभाष पाटील, प्रवीण भांगे, औदुंबर पवार, सुधीर माने यांनी नियोजन केले. सूत्रसंचालन रमेश कदम यांनी केले. प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून दिनेश जगदाळे यांनी काम पाहिले. यावेळी डॉ. सोमेश्वर टोंगळे, नागनाथ घाडगे, सचिन आप्पा घाडगे, भारत लटके, नागेश देशमुख, प्रशांत उबाळे आदी सहभागी झाले होते.

----

फोटो १५ माढा

माढा रोटरीच्या वतीने सायकल व आटा चक्की प्रदान करताना डॉ. सोमेश्वर टोंगळे, डॉ. सुभाष पाटील, नागेश घाडगे, दिनेश जगदाळे, अशोक लोंढे यांच्यासह आदी

Web Title: Madha Rotary donates a bicycle to Divyanga, a gift to a flour mill for women