माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 13:44 IST2017-07-27T13:20:36+5:302017-07-27T13:44:51+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला.

माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी भरला RTOचा दंड
सोलापूर, दि. 27 - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी ( 26 जुलै ) सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड भरला. वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्यानं सुशीलकुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागला.
गुरुवारी सकाळी 11.30 वाजता आरटीओ कार्यालयात येऊन शिंदे यांनी स्मार्ट कार्ड लायसन्स काढले. 11 नोव्हेंबर 1964मध्ये मोटरसायकल व चार चाकी वाहनाचे काढलेल्या परवानाच्या नुतनीकरणाची मुदत संपली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी कार्यालयात येऊन वाहन परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया पार पाडली.
2012 पासून वाहन परवाना नुतनीकरणास विलंब झाल्याने शिंदे यांना एकूण 2560 रुपये दंड भरावा लागला. यावेळी कायदा व नियम सर्वांना समान आहेत. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, अशी प्रतिक्रिया दंड भरल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.