शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

 प्रेम दिवस...भारतीय संस्कृतीला तिलांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 10:49 AM

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात ...

ठळक मुद्देआजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चाललेआपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत

सकाळी वर्तमानपत्र वाचत, थंडी असल्याने वाफाळलेल्या आद्रक चहाचे घोट घेताना, एक-दोन बातम्या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भातील वाचनात येताच माझ्या लक्षात आले की, १४ फेब्रुवारी जवळ आलेला दिसतो. आजकाल आपल्याकडे तरुण-तरुणींमध्ये परकीय संस्कृतीचे आकर्षण वाढत चालले असून मदर्स डे, फादर्स डे, फ्रेन्डशिप डे, व्हॅलेंटाईन डे असे रोज कुठले ना कुठले डे साजरे करण्यातच ते धन्यता मानत आहेत. यामुळे आपल्या सुंदर अशा समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक भारतीय संस्कृतीला आपण तिलांजली देत आहोत, याचे भान त्यांना राहिले नाही.

परकीय लोक आपली संस्कृती अभ्यासताना, शाकाहार करू लागलेत, त्यांच्याकडील स्त्रियांना तोकडे कपडे सोडून आपल्या अंगभर चोपून चोपून बसणाºया नऊवारीचं आकर्षण वाटू लागले आहे. त्या स्त्रिया कुणी तमाशावर अभ्यास करतंय तर कुणी बायका पारंपरिक वेशभूषा करून आषाढी पायी वारीला जाण्यात धन्य होऊ लागल्या आहेत. याउलट आपली तरुण पिढी भारतीय ज्ञानाने विद्याविभूषित होऊन आपल्या म्हाताºया आई-वडिलांसह भारतमातेला परके करून आपल्या ज्ञानाचा परदेशाला फायदा देत गलेलठ्ठ पगाराच्या नोकºयांच्या आकर्षणाने तिकडेच स्थायिक होण्यात धन्यता मानत आहेत. व्हॅलेंटाईन डे साजरा करणे, न करणे याच्या उलट सुलट चर्चा सुरू झाल्याने याची तीव्रतेने आठवण झाली.

मला ‘व्हॅलेंटाईन डे’ ज्याला मी प्रेम दिवस म्हणतो, तो आला की मंगेश पाडगावकरांच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं ! तुमचं नी आमचं अगदी सेम असतं’, या कवितेची तीव्रतेने आठवण होते. जी नुकतीच वयात येऊ लागलेली ही तरुण मंडळी शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात प्रवेशताना, निसर्ग नियमाप्रमाणे भिन्नलिंगी व्यक्तीविषयी ओढ, आकर्षण वाढू लागले की जे फक्त शारीरिक असते, त्यालाच प्रेम समजून बसतात. त्यांना प्रेम कशाशी खातात हे सुद्धा माहीत नसतं. त्यांना बरोबरचा मित्र किंवा मैत्रिण सिनेनट किंवा सिनेनटी वाटू लागते.

लैंगिक शिक्षणाच्या अभावाने, उदासीनतेमुळे हे घडते. आई, वडील, शिक्षक, सामाजिक, राजकीय दबाव या साºयांना झुगारून ते निरनिराळे डावपेच लढवून तो १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे साजरा करतातच आणि त्यात त्यांना जग जिंकल्याचा आनंद मिळतो. ‘प्रेमाला उपमा नाही, ते देवाघरचे देणे’ हे यांना समजतच नाही. जर आपण एखाद्यावर जर खरेखुरे प्रेम करत असू तर त्याला ते व्यक्त करण्यासाठी विशिष्ट महिना, दिवस, तारखेचे बंधन कशाला हवे ? त्याचे जाहीर प्रदर्शन करण्याची काही गरज नाही. प्रेम हे फक्त शारीरिक आकर्षण न राहता किंवा त्या व्यक्तीच्या बाह्यरुपावर न करता आंतरिक ओढीने मनापासून केलं तर ते नक्की यशस्वी होतं. पण, त्यात शारीरिक आकर्षण आणि तारुण्यसुलभ भावना आली तर तिथे त्या प्रेमाला फक्त आणि फक्त वासनेचा दर्पच येतो.

आपलं प्रेम कुसुमाग्रजांच्या ‘प्रेम असावे भिल्लासारखे..... ’ या ओळीप्रमाणे खरं असावं. तुमचं प्रेम खरं असेल तर ते सर्व संकटातून तावून सुलाखून निघते व कायम टिकते. त्यावेळी तुम्ही विरोधकांना, ‘प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?’ असं ठणकावून विचारू शकता. आपली महान भारतीय संस्कृती समजावून घ्या. परकियांच्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण जरूर करा पण मेणबत्ती फुंकून, दिवे विझवून असे दिवस साजरे करू नका. आपल्याकडे सणवार, वाढदिवस याला छानपैकी तबकात दोन निरांजन तेलवाती घालून ठेवतात.

हळद-कुंकू, अक्षता घेऊन छान औक्षण केलं जातं. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणे ही आपली संस्कृती आहे. पाश्चात्यांच्या अनुनयामध्ये भारतीय संस्कृतीला फक्त आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या ओळी बनवून ठेवू नका. आपली ही संस्कृती जपतानाच असे प्रेम करा की, पौराणिक कथेतल्या सावित्रीने यमदेवाकडून आपल्या नवºयाचे, सत्यवानाच्या प्राणाचे जीवदान घेतले, तिच्या प्रेमापुढे यमदेव हरले. अशा खºया प्रेमापुढे तुम्हाला प्रेम दिवस, व्हॅलेंटाईन डे फक्त १४ फेब्रुवारीला साजरा करण्याची गरज पडणार नसून दोघातील निखळ, निर्व्याज प्रेमामुळे ते प्रेम एक दिवसात दिलेल्या गुलाबासारखे सुकून न जाता ताजे टवटवीत राहील आणि तो एकच दिवस व्हॅलेंटाईन डे न होता रोजचाच दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा करता येईल.- गिरीश दुनाखे(लेखक साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे