शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

 लोकमत इनिशिएटिव्ह; जिथे कचरा साचतो तो परिसर नगरसेविका करणार सुशोभित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:27 IST

सोलापूर : सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, वाडिया हॉस्पिटल ते कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत. ...

ठळक मुद्देनगरसेविका फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे घेणार पुढाकारआता आम्ही लोकमतच्या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूरसाठी काम करु. 

सोलापूर : सात रस्ता ते रेल्वे स्टेशन, वाडिया हॉस्पिटल ते कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार थांबावेत. हा परिसर नियमितपणे स्वच्छ दिसावा यासाठी काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल आणि वैष्णवी करगुळे यांनी पुढाकार घेतला आहे.

घंटागाडी येऊनही रस्त्यावर कचरा टाकणाºयांची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिला ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहेत. या अभियानामध्ये जुळे सोलापूर, पूर्व भागातील नगरसेवकांनी सहभाग नोंदविला आहे. आता प्रभाग क्र. १६ च्या नगरसेविका फिरदोस पटेल आणि प्रभाग क्र. १५ च्या नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी वेगळ्या पध्दतीने सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. फिरदोस पटेल म्हणाल्या, स्मार्ट सिटी योजना जाहीर झाल्यापासून आम्ही आमच्या प्रभागात घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू केलेले आहे.

आमच्या घंटागाड्या नियमितपणे कचरा संकलित करतात. गांधीनगर, केशवनगर, आंबेडकरनगर, शानदार चौकातील कचरा कोंडाळी हटविण्यात आली. ज्या ठिकाणी कचरा कोंडाळी होती तो परिसर आम्ही स्वच्छ करुन घेतला. तिथे वृक्षारोपण करुन तो परिसर स्वच्छ केला. यासाठी शासन मदतीची वाट पाहिली नाही. या सर्व गोष्टी स्वखर्चातून केल्या आहेत. आता आम्ही लोकमतच्या अभियानात सहभागी होऊन स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूरसाठी काम करु. 

जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, कोनापुरे चाळ या भागात रस्त्यावर कचरा असतो. घंटागाडी आली नाही तर आम्ही झोनला फोन करतो. तरीही लोक रस्त्यावर कचरा टाकतात हे पाहून वाईट वाटते. आमचा प्रभाग आता स्वच्छ असला पाहिजे, यासाठी आम्ही लोकांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून रोखणार आहोत. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल. जे लोक चांगले काम करतील, त्यांचा गौरव करण्यात येईल. - वैष्णवी करगुळे, नगरसेविकासध्या मोदीखाना, रेल्वे स्टेशन रोड या भागात खूपच कचरा दिसतो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी. पण त्यांना नियमितपणे घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लागायला हवी. ‘लोकमत’च्या स्मार्ट सखी यासाठी सध्या काम करीत आहेत. त्याच पध्दतीने आम्ही आमच्या वॉर्डात स्मार्ट सखींची टीम तयार करणार आहोत. सात रस्ता परिसरात ज्या भागात मेडिकल आहेत तिथे मेडिकल वेस्टेज रस्त्यावर टाकले जात आहे. तिथे झाडी लावून तो भाग सुशोभित करणार आहोत. - फिरदोस पटेल, नगरसेविका

टॅग्स :SolapurसोलापूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नLokmat Eventलोकमत इव्हेंटSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका