शहरं
Join us  
Trending Stories
1
Ghatkopar Hording Collapse: चौघांचा मृत्यू, ५१ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
2
KKRचा संघ QUALIFIER 1 साठी पात्र, LSG चे आव्हानं संपल्यात जमा! अहमदाबादहून Live Updates 
3
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
4
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
5
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
6
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
7
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
8
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
10
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
11
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
12
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
13
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
14
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
15
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
16
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
17
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
18
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
19
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
20
बस ट्रकवर आदळून हैदराबादचा प्रवासी ठार; १५ जण जखमी, उपचारासाठी सोलापुरात दाखल

लोकमत इनिशिएटिव्ह; कचरा टाकणाºयांना जाग यावी यासाठी नगरसेविका काढणार जनजागृती रॅली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:31 PM

जुळे सोलापूर : कचराफेकूंवर अधिकाधिक दंडात्मक कारवाईचा इशारा

ठळक मुद्देसोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ शहरात रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांची पोलखोल स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेला गतीया मोहिमेत शहराच्या विविध भागातील महिला सहभागी होत आहेत.

सोलापूर : कचरा संकलित करण्यासाठी नियमित घंटागाडी येऊनही रस्त्यावर टाकणाºया कचराफेकंूना जाग यावी यासाठी जुळे सोलापूर भागातील नगरसेविका  लवकरच जनजागृती रॅली काढणार आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या आठवड्यात कचराफेकूंच्या बंदोबस्तासाठी जास्तीत जास्त  दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांना अटकाव घालण्यासाठी शहरातील स्मार्ट महिलांनी लोकमतच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. शहरातील अनेक भागातील महिला बेशिस्त लोकांना रस्त्यावर कचरा टाकण्यापासून रोखत आहेत. 

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाईचा धडका  लावला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अनेक लोकांवर दंडात्मक कारवाई झाली.  यादरम्यान भाजपच्या नगरसेवकांनी  लोकमतच्या अभियानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आपल्या प्रभागात जनजागृती रॅली काढणार आहेत.

‘प्रारंभ’ने प्रारंभही केला- संगीता जाधव- आमचा प्रारंभ प्रतिष्ठानच्या वतीने जुळे सोलापुरातील काही भागात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावले आहेत. आता पुन्हा नव्याने आम्ही मोहीम हाती घेत आहोत. प्रभागात एक रॅली काढून रस्त्यावर कचरा टाकणाºया नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करु. सोलापूर शहर स्मार्ट होतंय, त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. रस्त्यावर कचरा टाकण्याविरोधात  छेडण्यात येणाºया मोहिमेत विद्यार्थी सहभागी होतील. विद्यार्थी ही पुढची पिढी आहे. त्यांना एकदा चांगली गोष्ट समजली की ते आपल्या पालकांना स्वच्छतेबाबत जागरुक राहायला सांगतील. जे ऐकणार नाहीत त्यांच्यावर महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करायला सांगणार आहोत, असे नगरसेविका संगीता जाधव यांनी सांगितले.

आम्ही यापूर्वी आमच्या प्रभागात जनजागृती स्वच्छता रॅली काढली होती. नियमित घंटागाड्या येत असताना लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. ही सवय बदलायला वेळ लागेल. आपलं शहर स्मार्ट होतंय, मग आपण या सवयी बदलायला हव्यात, असे लोकांना वाटले पाहिजे. आमच्या शाळेतील मुलांसमवेत आम्ही या आठवड्यात जनजागृती रॅली काढणार आहोत. आमच्या प्रभागातील ज्या रस्त्यावर आजही कचरा दिसतोय. त्या भागातील लोकांना समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करु. लोकांमध्ये बदल होईल, अशी आम्हाला खात्री आहे.-अश्विनी चव्हाणनगरसेविका प्रभाग क्र.२४

स्मार्ट महिलांनी हातात खराटा घेऊन केली सफाई

  • - सोलापूर : महापालिकेची घंटागाडी नियमित येत नसल्याने कांचनगंगा नगरातील महिलांनी आज रस्त्यावरील कचरा साफ केला. यापुढे कोणीही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जी महिला अथवा पुरुष रस्त्यावर कचरा टाकेल त्यांची नावे महानगरपालिकेला कळविण्यात येणार असल्याचा एल्गार येथील भगिनींनी रविवारी दुपारी घेतला.
  • - सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ शहरात रस्त्यावर कचरा टाकणाºया लोकांची पोलखोल करीत आहे. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेला गती देण्यासाठी सुरू झालेल्या या मोहिमेत शहराच्या विविध भागातील महिला सहभागी होत आहेत.
  • - काचनगंगा नगरात घंटागाडी नियमित येत नसल्याने काही महिला रस्त्यावर कचरा टाकतात, त्याचा त्रास सगळ्यांना सोसावा लागत आहे. परिसरातील घाणीमुळे एका महिन्यात आठ वर्षांच्या मुलाला दोनदा डेंग्यूचा आजार झाला असे एका भगिनीने सांगितले. तेथील दीप्ती कुलकर्णी, सुनीता बायस, अश्विनी नरोटे, वर्षा पुजारी, मंगल यवतकर, गीता वाघमोडे, अंबिका चडचणे, रसिया फजल खान, महानंदा हलवळे, श्वेता राजमाने, कस्तुरबाई हालोळे, लक्ष्मीबाई सोनकट्टे यांनी दुपारी हातात खराटा घेऊन परिसर साफ केला. यापुढे रस्त्यावर कचरा टाकणार नाही, जो कोणी कचरा टाकेल त्याची नावे मनपा प्रशासनाला कळविण्यात येणार आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीLokmat Eventलोकमत इव्हेंट