मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी
By Appasaheb.patil | Updated: January 29, 2023 19:00 IST2023-01-29T18:59:29+5:302023-01-29T19:00:21+5:30
रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले.

मोठी बातमी! 'लोकमत' च्या 'लगाव बत्ती'चा धुमधडाका; सोलापूरच्या मनिष काळजेंची हकालपट्टी
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक पदावरून सोलापुरातील मनिष काळजेंची हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र रविवारी प्रसिध्द झाले.
आव ‘सामाजिक बांधिलकी’चा..हेतू मात्र ‘बस्ता बांधाबांधी’चा. इथं सारंच अडप झडप..चिल्लर गडप अशीच आहे. ‘पार्टी’च्या ’दसरा मेळाव्या’ला म्हणे एका ‘पीआय’ला चक्क ‘दहा पेट्या’ मागितल्या. तेही खुद्द ‘एकनाथभाईं’नी आदेश दिल्याचं सांगत. त्यात पुन्हा भाषाही उर्मट. तेव्हा वेळप्रसंगी खंडणीची ‘क्राईम’ केस ठोकण्याच्या तयारीत असलेल्या या ‘पीआय’नं कॉल व्यवस्थित रेकॉर्ड केलेला. असे अनेक पुरावे कैक अधिकाऱ्यांनी आता सेव्ह करून ठेवलेत. अशा विचित्र ‘तोडीबहाद्दरांची धंदेवाईक दलाली’ सोलापूरकरांनी प्रथमच पाहिलेली असा शब्दात रविवारी लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत लगाव बत्ती प्रसिध्द झाले.
लगाव बत्ती प्रसिध्द होताच मनिष काळजे याना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या समन्वयक पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"