शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:02 IST

सुस्ते परिसरातील शेतकरी संकटात; लाख रुपयांच्या मेहनतानाचा चुराडा; शेतात अन् बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी

ठळक मुद्देपरतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाहीआता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागलीकणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात

अंबादास वायदंडे

सुस्ते : चार महिने जिवापाड जपलेल्या मकेच्या पिकाला पंधरा दिवसांत परतीच्या पावसानं घेरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. उसाला जादा पाणी लागतं म्हणून तीन एकरात मका लावण्याचा निर्णय घेतला. पण कशाचं काय? संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय. त्याला कोण काय करणार? असा हताश सूर सुस्ते (ता. पंढरपूर)च्या हिंदुराव अडसुळ यांनी शेतातल्या बांधावर पोहोचलेल्या ‘लोकमत’च्या चमूशी बोलताना व्यक्त केला. 

भकास चेहºयानं आपली व्यथा मांडताना हिंदुराव अडसुळ म्हणाले.. चार महिन्यांपूर्वी मेहनतीसह एक लाख रुपये खर्च करून अ‍ॅडव्हान्टा ९२:९६ या जातीच्या मकेची लागवड केली. कमी पाणी असल्याने रात्रीचा दिवस करून मकेला काटकसरीने पाणी दिले. लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या होत्या. मकेच्या पिकाला नजर लागेल, असे पीक शेतात आले होते.  पिकाचे पूर्ण दिवस झाल्यानंतर कणसांची काढणी सुरू होती. मकेच्या ताटाची कणसेही मोडून शेतात जागोजागी टाकली होती. पण कणसे शेतातून उचलण्याअगोदरच परतीच्या पावसाने जोर धरला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले. डबडबल्या डोळ्यांनी हिंदुरावांनी आपलं गाºहाणं मांडलं. 

परतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाही. आता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागली आहे, तर काही कणसांना मोड आले आहेत. कणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात असल्याने ते बघण्याशिवाय काहीही करता येत नसल्याची खंत हिंदुराव अडसुळ यांनी व्यक्त केली.

मकेच्या पिकापासून १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते. मात्र परतीच्या पावसात सापडल्याने कणसं पूर्ण काळी पडली, बुरशी लागली व कणसाला मोड आले आहेत. त्यामुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे ३ लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची हमी होती. परंतु अवकाळी पावसाने जोर धरल्याने मकेच्या पिकाला खर्च केला तेवढासुद्धा निघत नसल्याचे अडसुळ यांनी सांगितले. परतीच्या पावसाने सुस्ते परिसरात फळबागेचे व इतर पिकांचे नुससान झालेल्या पिकांचे शासनामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अडसुळ यांच्या मकेच्या शेतात पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक राहुल मोरे, तलाठी प्रकाश गुजरे, ग्रामसेवक विष्णू गवळी, हनुमंत कवळे, कोतवाल दिगंबर बंगाळे, बिभीषण पाटील आदी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने सर्रास शेतकºयांनी मका, कांदा, फळबाग व इतर पिकांची लागवड केली. यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी एकही पाऊस झाला नव्हता. कमी पाण्यावर जगवलेली पिके परतीच्या पावसाने पूर्ण नष्ट झाली आहेत. या अवकाळीत आम्हा शेतकºयांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी.- हिंदुराव अडसुळमका उत्पादक शेतकरी, सुस्ते

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस