शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लोकसभेची निवडणूक जातीवर जाणार; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 10:13 IST

महायुतीचे प्रचार कार्यालय मेकॅनिक चौकातील टाईम स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देमध्यवर्ती कार्यालयात भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक या बैठकीला भाजपच्या ५१ नगरसेवकांपैकी २० नगरसेवक हजर होतेशिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना या कार्यक्रमाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. 

सोलापूर : लोकसभेची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. ही निवडणूक जातीवर जाते की काय, अशी भीती आम्हाला वाटत आहे, अशी शंका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. 

महायुतीचे प्रचार कार्यालय मेकॅनिक चौकातील टाईम स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी त्याचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, शिखर बँकेचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, किशोर देशपांडे, विक्रम देशमुख, श्रीमंत बंडगर आदी उपस्थित होते. महेश कोठे म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. गाफील राहिले की धोका झालाच म्हणून समजा. 

नगरसेवकांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी मध्यवर्ती कार्यालयात सकाळच्या सत्रात भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपच्या ५१ नगरसेवकांपैकी २० नगरसेवक हजर होते. यावरुनही बैठकीत खसखस पिकली.  जे अनुपस्थित आहेत, अशा सर्व नगरसेवकांच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेणार आहे, अशा शब्दात भाजपचे सहनिवडणूक प्रमुख किशोर देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे काही मोजके नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना या कार्यक्रमाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक