शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : कोण आहेत भाजपाचे सोलापूरचे उमेदवार जयसिद्धेश्वर महाराज?; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:17 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने हा नवा चेहरा सोलापूरकरांना दिला आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने हा नवा चेहरा सोलापूरकरांना दिला आहे.जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर यांच्यासाठी जोर लावला होता.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कापून भाजपने हा नवा चेहरा सोलापूरकरांना दिला आहे.

मुळात जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून या स्वामींनी संत साहित्य अन् धर्म प्रवचन हेच कार्य अंगिकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 साली भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होता; त्यावेळीही यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली होती. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जातीची वैध प्रमाणपत्रे सविस्तर नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. अन् त्यांनीही त्यावेळी राजकारणात उतरण्याबाबतची ठाम भूमिका घेतली नव्हती.

मात्र गेल्या दोन महिन्यांपासून जयसिद्धेश्वर यांचे नाव जोरात चर्चिले जात होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जयसिद्धेश्वर यांच्यासाठी जोर लावला होता. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशीही चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी जयसिद्धेश्वर यांनाच उमेदवारी देण्याचे निश्चित केले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSolapurसोलापूरBJPभाजपा