सोलापूरचं 'कुलूप' उद्या उघडणार; बार्शीत मात्र 31 जुलैपर्यंत 'लॉकडाऊन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 22:02 IST2020-07-26T18:01:30+5:302020-07-26T22:02:10+5:30
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, शहरातील लॉकडाऊनचा हेतू यशस्वी झाल्याचा दावा

सोलापूरचं 'कुलूप' उद्या उघडणार; बार्शीत मात्र 31 जुलैपर्यंत 'लॉकडाऊन'
सोलापूर : सोलापूर शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येणार मात्र बार्शी तालुक्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत कायम राहील, असे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रविवारी जाहीर केले.
पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापुरात लागू केलेल्या लॉकडाऊनचा किती परिणाम झाला हे आपल्याला आणखी आठ ते दहा दिवसांनी कळेल. तुम्हाला निश्चितच फरक पडलेला दिसेल.
मागच्या लॉकडाऊनपेक्षा आणि राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हा दहा दिवसांचा लॉकडाऊन सोलापुरातील जनतेने यशस्वी केला. बार्शीमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दररोज बार्शीतील उपायोजनांचा आढावा घेत आहोत. या तालुक्यातील लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असेही त्यांनी सांगितले.