स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:40 IST2021-03-13T04:40:50+5:302021-03-13T04:40:50+5:30

मोहोळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या पात्रात धाड टाकून वाळूसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला ...

Local Crime Branch seizes Rs 2 lakh | स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन लाखांचा ऐवज जप्त

मोहोळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहोळ तालुक्यातील सीना नदीच्या पात्रात धाड टाकून वाळूसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथील सीना नदीतून वाळूची चोरी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ११ मार्च रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास सीना नदी पात्रातील वाळू चोरून नेताना हनुमंत दिगंबर पाटील (२९, रा. लांबोटी, ता. मोहोळ), राजू महादेव सर्वगोड, विकास वाघमारे, सोमा जगताप (रा.शिरापूर), अमोल पाटील (मोरवंची), विष्णू पाटील (लांबोटी), पप्पू पाटील (शिरापूर) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी टेम्पो (क्र. एमएच १२ ईए ७२७७) जप्त केला आहे. टेम्पोशिवाय दोन लाख १,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार शेलार करीत आहेत.

Web Title: Local Crime Branch seizes Rs 2 lakh