शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

सोलापूरकरांची घरं सजविणारे बिहारी अन् राजस्थानी राहतात इवल्याशा खोपटात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 15:59 IST

कुशल कारागिरांची वानवा;  वेळेवर काम होत असल्याने कंत्राटदाराचे यांनाच प्राधान्य

ठळक मुद्देइंटिरियर डिझायनिंगमध्ये सुबक काम आणि वेळेला खूप महत्त्वराजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यातील अनेक मुकादम सोलापुरात स्थायिक झालेपीओपी सिंलिंग आणि फर्निचरच्या कामाचा व्यापार  उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील कामगारांनी व्यापला

राकेश कदम 

सोलापूर : घराच्या इंटिरियरमध्ये फर्निचर डिझाइन, पीओपी सिलिंग याला खूप महत्त्व आहे. ही कामे करणारे हजारो परप्रांतीय तरुण जिल्ह्यात कार्यरत आहेत. कुटूंबापासून दूर छोट्याशा जागेत राहून तरुण मुले शेकडो लोकांची घरे सजविण्यासाठी अहोरात्र झटत असतात.  सुबक, आकर्षक आणि वेळेवर काम पूर्ण करण्याच्या पध्दतीमुळे शहर आणि जिल्ह्यातील कंत्राटदारही या मंडळींकडून काम करुन घेण्यास प्राधान्य देत आहे. 

पीओपी सिंलिंग आणि फर्निचरच्या कामाचा व्यापार  उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील कामगारांनी व्यापला आहे. लखनौ (उत्तर प्रदेश) जवळच्या बस्ती गावचे शफीकउल रहमान खान  वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या मामासोबत सोलापुरात आले. मामा पीओपी सिलिंगचे काम करायचे. शिवाय एक बेकरीही होती. एक-दोन वर्षे बेकरीत काम केल्यानंतर शफीक यांनाही सिलिंगच्या कामाची आवड निर्माण झाली. कारागिरीतील हातखंडा पाहून मामांनी प्रोत्साहन दिले.

शहरातील नामांकित कंत्राटदारांनी शफीक यांना काम द्यायला सुरुवात केली. शफीक यांनी नंतर दोन लहान भावांना बोलावून घेतले. शफीक, त्यांचे बंधू मज्जीबूर खान, मतीउल खान यांच्यासह त्यांच्या सहकाºयांनी गेल्या १६ वर्षात सोलापूर शहरासह खेड्यापाड्यातही पीओपी सिलिंगची कामे करुन अनेकांच्या घरांना चारचाँद लावले आहेत. खान कुटूंबीय कल्याण नगरमध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. सोबत पत्नी, दोन भाउही असतात. आम्ही आता सोलापूरकरच झालो आहोत. गावाकडे दोन बहिणी, आई-वडील असतात. वर्षा-दोन वर्षातून एकदाच गावाकडे जातो, असेही त्यांनी सांगितले. 

जोधपूर (राजस्थान) येथील बाबुराव सुतार दहा वर्षांपासून सोलापुरात दयानंद महाविद्यालय परिसरात स्थायिक आहेत. जोधपूर भागात अनेक सुतार कुटूंबीय आहेत. शाळेला जाता-जाता अनेक मुले काम शिकून घेतात. कुटूंबांच्या अडचणींमुळे त्यांना गाव सोडावे लागते. आम्ही आमच्या कुटूंबीयांकडे इकडे आणलेले नाही. एक दोन महिने काम केले की गावाकडे जातो, असेही सुतार यांनी सांगितले.

मुकादम हेरतात कुशल कामगारांना - राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात या राज्यातील अनेक मुकादम सोलापुरात स्थायिक झाले आहेत. काहींची दुकाने आहेत. गावाकडे गेल्यानंतर आपल्या ओळखीतील होतकरु मुलांना ते हेरतात. त्यांच्या आई-वडिलांना सहा महिने अथवा वर्षभराचे एकवट पैसे दिले जातात. इकडे आणल्यानंतर त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय केली जाते. कामागणिक पैसेही दिले जातात. फर्निचर आणि सिलिंगचे काम करताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आजारी पडल्यानंतर ओळखपत्राअभावी सरकारी दवाखान्यात जायची अडचण होते. गरीब स्वभावाच्या मुलांना रिकाम टेकड्या स्थानिक तरुणांचा त्रास होतो. पण हा त्रास विसरुन पोटासाठी पुन्हा दिवस चालू होतो, असे आर्किटेक्चर कादीर जमादार यांनी सांगितले. 

इंटिरियर डिझायनिंगमध्ये सुबक काम आणि वेळेला खूप महत्त्व असते. स्थानिक माणसे कामाची वेळ पाळत नाहीत. चार दिवस गेले की घरातल्या अडचणी सांगून काम टाकून निघून जातात. परप्रांतीय माणूस अडचणीवेळी निघून जाईल. पण जाताना पर्यायी माणूस देउन जातो. आमच्याकडे काम करणारी माणसे छोट्या घरांमध्ये राहतात. त्यांच्या अडीअडचणी पाहिल्या की पुन्हा मन लावून काम करतात. स्थानिकांचे अनुभव न सांगितलेले बरे. - मनोज खुब्बा, कन्स्पेट इंटिरियर

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसाय