राजस्थान, गुजरातमधून आलेल्या गीर गायीं सोलापूरच्या जनावर बाजारात

By Appasaheb.patil | Published: January 18, 2020 02:04 PM2020-01-18T14:04:01+5:302020-01-18T14:07:02+5:30

गवळार, जाफराबादी म्हशी विक्रीसाठी दाखल; चारा भरपूर असल्याने खरेदीचे प्रमाणही अधिक

Livestock cows from Rajasthan, Gujarat at Solapur cattle market | राजस्थान, गुजरातमधून आलेल्या गीर गायीं सोलापूरच्या जनावर बाजारात

राजस्थान, गुजरातमधून आलेल्या गीर गायीं सोलापूरच्या जनावर बाजारात

googlenewsNext
ठळक मुद्देयंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झालीयंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे१० हजारांपासून चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत

सुजल पाटील

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने सोलापूर-विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ भरविण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे २५ हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत़  यात खिलार गायी-बैलांसह मुरा, खोंड, गीर गाय, गवळार जातीच्या व जाफराबादी म्हशींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या बाजारात लाखोंची उलाढाल होत आहे़ या बाजारात राजस्थान, गुजरातमधील गीर या गावच्या गीर गायींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळील १० ते २० एकरात जनावरांचा बाजार भरविण्यात आलेला आहे़  मागील वर्षीपेक्षा यंदाच्या जनावरांच्या बाजारास नागरिक, शेतकºयांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाचा जनावरांचा बाजार हाऊसफुल्ल झाला आहे. या बाजारात १० हजारांपासून अडीच ते चार लाखांपर्यंतची जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत़  मागील वर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.

या पावसामुळे चाºयाचा प्रश्न मिटला आहे़  यामुळे दूध देणाºया म्हशी, गायी यांच्या विक्रीचे प्रमाण कमी आहे़  मात्र ज्या गायी, म्हशी बाजारात दाखल झालेल्या आहेत त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत़ शिवाय खरेदीचे प्रमाणही अधिक आहे. म्हशीची १५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत विक्री होत आहे़  यात जाफराबादी, मुर्रा जातीच्या म्हशीची किंमत ५० हजार ते सव्वा लाखापर्यंत आहे़  यंदा बाजारात मंदिर समितीच्यावतीने पाण्यासह शेतकºयांसाठी लागणाºया सर्व सेवासुविधा पुरविण्यात आल्याची माहिती चिदानंद वनारोटे यांनी दिली़ 

कर्नाटक, मराठवाड्यातील जनावरे बाजारात...
- हा बाजार रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसर ते मोदी रेल्वे बोगद्यापर्यंत भरलेला आहे. कर्नाटक, मराठवाडा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तसेच विविध भागातील शेतकºयांनी जनावरे विक्रीस आणली आहेत. यंदाच्या जनावरांच्या बाजारात विविध प्रकारचे बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय, म्हशीमध्ये-पंढरपुरी म्हशी, गेरू म्हैस, जाफराबादी म्हैस, मुर्रा जातीच्या म्हैशी विक्रीसाठी आहेत़ गीर गाय ही साधारणत: १२ लिटर दूध देते़  या म्हशीची अंदाजे किंमत १० हजारांपासून सव्वा लाखांपर्यंत आहे़  जाफराबादी म्हशीसह गीर गायीला, म्हशीला बाजारात मोठी मागणी आहे तसेच विविध प्रकारची जनावरे विक्रीस आली आहेत़

यंदाच्या जनावर बाजारात मागील वर्षीपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली आहेत़  यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होत आहे़  बाजारात विविध जातींचे बैल, म्हशी दाखल झाल्या आहेत़  १० हजारांपासून चार लाखांपर्यंतची जनावरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत़
- आबासाहेब सुतार, शेतकरी

यंदा रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोर भरविण्यात आलेल्या जनावर बाजारात मंदिर समितीच्या वतीने शेतकºयांसाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत़  बैल, खोंड, गाय, जर्सी गाय, तांबड्या रंगाची गीर गाय विक्रीसाठी दाखल झालेली आहेत़  यंदा खिलार बैल व जाफराबादी म्हशीला चांगली मागणी आहे़ 
- सुरेश पवार, शेतकरी

पोलीसांचा चोख बंदोबस्त...
- जनावरांच्या बाजारात जनावरास काही इजा झाल्यास दवाखान्याची सोय आहे. त्याचबरोबर आलेल्या शेतकºयांसाठी चहा-पाणीसाठी हॉटेल, फळविक्रेते आणि खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स याठिकाणी आहेत़  जनावरांसाठी पाण्याबरोबर चाºयाची व्यवस्थादेखील करण्यात आलेली आहे़  सकाळी सहापासून ते रात्री उशिरापर्यंत जनावरांचा बाजार सुरूच असतो. याठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Web Title: Livestock cows from Rajasthan, Gujarat at Solapur cattle market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.