सोलापुरातील सात महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:29 PM2019-07-03T14:29:53+5:302019-07-03T14:32:54+5:30

पहिल्या यादीसाठी ५ जुलै प्रवेशाची मुदत : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी आता ८ जुलैला प्रसिद्ध

The list of Science Colleges of seven colleges is more than 85% | सोलापुरातील सात महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक

सोलापुरातील सात महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देदहावीच्या निकालानंतर शहर व जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची धामधूम मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली़ यात सात महाविद्यालयांची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवर लागलीदहावीचा निकाल पुणे महामंडळाने आॅनलाईन जाहीर केला़ त्यानंतर सर्वत्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली

सोलापूर : दहावीच्या निकालानंतर शहर व जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची धामधूम दिसत आहे़ मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली़ यात सात महाविद्यालयांची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवर लागली आहे़ यंदा संगमेश्वर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ९१.६ टक्के, ए़ डी़ जोशी कॉलेजची गुणवत्ता यादी ८८ टक्के, वालचंद कॉलेजची ८७.२ टक्क्यांवर बंद झाली़ यंदा पहिली यादी जास्त टक्केवारीला ‘क्लोज’ झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले़ अनेक विद्यार्थ्यांत पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे नाराजी दिसली.

दरम्यान, दहावीचा निकाल पुणे महामंडळाने आॅनलाईन जाहीर केला़ त्यानंतर सर्वत्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली़ यंदा कला, वाणिज्यपेक्षा सायन्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्तीचा दिसून आला़ मंगळवारी अकरावी प्रवेशाची यादी पाहण्यासाठी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती़ याचबरोबर आपल्या पाल्याला मदत करण्यासाठी पालकांचीही तेवढीच गर्दी महाविद्यालयांत दिसत होती़ पहिल्या यादीमध्ये नाव असणाºया विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा लागेल़ 
दुसरी यादी ८ जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे़ आणि जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे़ प्रवेशासाठी गुणपत्रिका, एलसी आणि जातप्रमाणपत्र आवश्यक आहे.

महाविद्यालयाचे मेरीट..........
कॉलेजचे नाव    खुला प्रवर्ग     एससी    एसटी    ओबीसी    एसईबीसी

  • संगमेश्वर कॉलेज     91.6    85.2    39.8    86    80.2    
  • ए़ डी़ जोशी कॉलेज     88    69    39.8    76    73.8
  • भारती विद्यापीठ     89.00    84.2    68.40    85.8    76.8
  • एच़डी़ ज्युनिअर कॉलेज     86.4    76.6    57.8    76.4    80
  • डी़बी़एफ़ दयानंद कॉलेज 85.8    73.8    76.8    77.2    73.6
  • डी़एच़बी़ सोनी कॉलेज    73.8    78.4    68.4    80    77
  • वालचंद कॉलेज     87.2    -    -    -    -

Web Title: The list of Science Colleges of seven colleges is more than 85%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.