लिंबिचिंचोळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:16 IST2021-01-01T04:16:49+5:302021-01-01T04:16:49+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबिचिंचोळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. राजकीय पक्षांना आणि तालुक्यातील ...

Limbichincholi Gram Panchayat election unopposed | लिंबिचिंचोळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

लिंबिचिंचोळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लिंबिचिंचोळी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले आहे. राजकीय पक्षांना आणि तालुक्यातील नेत्यांना बाजूला ठेवून समझोता करण्यात कार्यकर्ते यशस्वी ठरले आहेत.

सोलापूर बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, मावळते सरपंच नटराज नरळे यांनी विरोधी गटाला सोबत ठेवून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला. श्रीशैल माळी, श्रीमंत किवडशेट्टी यांनी त्यांना प्रतिसाद दिला. नऊ जागांसाठी तितकेच अर्ज दाखल करण्यात आले. त्यात स्वाती संतोष गायकवाड, हिराचंद गुरव, श्रीकांत कोरे, उर्मिला प्रफुल्ल चिंचोलीकर, दस्तगीर माशाळे, सावित्री मल्लिनाथ सुरवसे, गीतांजली श्रीशैल माळी, रत्नाबाई सिद्दप्पा कलशेट्टी, संतोष हाके यांनी अर्ज भरले. समझोता करण्यासाठी सिद्धेश्वर नरोळे, महादेव माळी, रमेश लिंबीतोटे, श्रीशैल हक्के, शिवानंद रेड्डी, काशिनाथ सोरेगाव , सिद्धाप्पा सोरेगाव यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Limbichincholi Gram Panchayat election unopposed