शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न दोन खासदार, ५ आमदारांची भूमिका महत्त्वाची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:18 IST

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला फारसे यश झाले आहे. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ने अकलूजमध्ये सत्ता मिळविली.

सोलापूर : महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी करूनच लढण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या बैठकीत रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यात दोन खासदार, पाच आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला फारसे यश झाले आहे. त्याचा फटका सर्वच पक्षांना बसला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ने अकलूजमध्ये सत्ता मिळविली. तर उद्धवसेनेने कुडूवाडी नगराध्यक्षपद मिळविली. बहुमत मात्र राष्ट्रवादी (अजित पवार) कडे राहिली. त्यामुळे सोलापूर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, माकप,हालचालींना वेग महाविकास आघाडीत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नेतृत्व आहे. मात्र, नगरपालिकेत महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न झाला नाही. आ. दिलीप सोपल, आ. राजू खरे, आ. नारायण पाटील, आ. उत्तम जानकर, आ. अभिजित पाटील, असे पाच आमदार महाविकास आघाडीचे असून त्यांच्यात एकवाक्यता नव्हती. त्याचा फटका बसला. त्यातून धडा घेत आता महापालिकेत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मनसेची महाविकास आघाडी करण्यात आली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची ताकद एकवटण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोहोळमध्ये बैठक.. एकसंघ राहण्याचा निर्णय

मोहोळ : येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याबाबत मोहोळ तालुका महाविकास आघाडीची बैठक मोहोळ येथे पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकसंघ करून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी संयुक्तपणे तालुक्यात दौरा करणे, इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागविणे व महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत आवाज उठवून सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करणे तसेच जनतेत सरकार विरोधात असलेला असंतोष जनतेसमोर मांडणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय क्षीरसागर, सुरेश शिवपुजे, अशोक भोसले, तुकाराम माने, सत्यवान देशमुख, दादासाहेब पवार, सतीश पाटील, दत्तात्रय पाटील, विलास पाटील, धनाजी गायकवाड, अनिल महानवर, बंडू देवकते पप्पू पाटील, विकास जाधव, धीरज कसबे, अॅड. विठोबा पुजारी, संतोष कारंडे आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Maha Vikas Aghadi effort in Zilla Parishad like Municipal Corporation elections.

Web Summary : Efforts are underway to form a Maha Vikas Aghadi alliance in the Zilla Parishad, mirroring the municipal corporation strategy. Key roles are played by two MPs and five MLAs, aiming for unity.
टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026