शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जिवदान; तब्बल दोन तासानंतर पाण्यातून काढले बाहेर!

By संताजी शिंदे | Updated: March 23, 2023 12:35 IST

उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतात पडलेल्या कोल्ह्याला जिवदान देण्यात आले.

संताजी शिंदे, सोलापूर: उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतात पडलेल्या कोल्ह्याला जिवदान देण्यात आले. पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धडापड करणाऱ्या कोल्ह्याला तब्बल दोन तासानंतर बाहेर काढण्यात यश आले. बाहेर आल्यानंतर कोल्हा ऊसाच्या शेतात पळून गेला.

गुरूवारी सकाळी संदीप माणिक पवार यांच्या शेतातील विहिरीत एक कोल्हा पडला होता. संदीप पवार हे शेतात पाणी देण्यासाठी म्हणून विहिरीत असलेली मोटार चालू करताना, त्यांना विहिरीत पाण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिल असता आतमध्ये कोल्हा पाण्यावर पोहत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. संदीप पवार यांनी तत्काळ गावातील राहुल पवार यांना फोन करून माहिती दिली.

राहुल पवार यांनी कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती देण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाला केला, पण ऑफिस बंद असल्याने फोन उचलला गेला नाही.  राहुल पवार यांनी याबाबत तत्काळ चेतन गायकवाड यांना माहिती दिली. गायकवाड यांनी लगेचच वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे यांच्याशी संपर्क साधून कोल्हा पाण्यात पडल्याची माहिती दिली. संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, अजित चौहान आणि ओंकार घुले हे सर्वजण घटनास्थळी पोहचले. भाजीचे कॅरेट, दोरी आणि बांबू या उपलब्ध असलेल्या साधनाने सर्व सदस्यांनी  कोल्ह्याला अलगद बाहेर काढले. कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागला. कोल्हा कॅरेटमध्ये बसून वर आल्यावर, क्षणातच तो तिथून ऊसाच्या शेतात पळाला. या बचाव कार्यात वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांबरोबर विजय राठोड, राहुल पवार, सद्दाम शेख, आदीनी परिश्रम घेतले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूर